Asia Cup : ‘टीम इंडिया फायनल पर्यंत…’, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने भारताला डिवचलं

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ind vs pak asia cup 2023 pakistan pacer wasim akram big statement team india pakistan
ind vs pak asia cup 2023 pakistan pacer wasim akram big statement team india pakistan
social share
google news

India vs Pakistan Asia cup 2023: येत्या 30 ऑगस्टपासून आशिया कपला (Asia cup 2023) सुरुवात होणार आहे. या आशिया कपमध्ये 2 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) भिडणार आहेत. या व्हायव्होल्टेज सामन्याची उत्सुकता असताना पाकिस्तानने माईंड गेम खेळायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटरने वसीम अक्रमने मोठं विधान करून भारताला डिवचसं आहे. आता वसीन अक्रम काय म्हणालेत? हे जाणून घेऊयात. (ind vs pak asia cup 2023 pakistan pacer wasim akram big statement team india pakistan)

पाकिस्तानचा माजी क्रिकेटरने वसीम अक्रमने एका स्पॉन्सर इवेंटला पोहोचला होता. या इवेंटमध्ये त्याने भारत गेल्या वर्षी आशिया कपच्या फायनलपर्यंत देखील पोहोचू शकला नव्हता, असे विधान करून वसीम अक्रमने टीम इंडियाला डिवचलं होतं. तसेच एका पत्रकाराने त्यांना भारत-पाकिस्तान सामन्याशिवाय इतर सामन्यांकडे फारसे लक्ष दिले जात नाही, असा प्रश्न विचारला होता. यावर अक्रम म्हणाला, गेल्या वर्षी सर्वजण भारत आणि पाकिस्तानला फायनलमध्ये पाहत होते.पण श्रीलंकेने सर्वांना चकित करत आशिया कपचे विजेतेपद पटकावले. त्यामुळे हे तिन्ही संघ सरस आणि विजेतेपदाचे दावेदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:  Chandrayaan 3: प्रज्ञान रोव्हरच्या वाटेवर भला मोठा खड्डा, कसा मार्ग काढणार? इस्त्रोने दिली माहिती

वसीम अक्रम पुढे म्हणाले, गेल्या वर्षी श्रीलंकेने जेतेपद पटकावले होते आणि भारताला अंतिम फेरीतही प्रवेश मिळवता आला नव्हता, असे विधान करून त्यांनी टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने आशिया कपसाठी पाकिस्तान न जाण्याचा निर्णय़ घेतला होता? या निर्णयावर वसीम अक्रम म्हणाले, खेळांना राजकारणापासून वेगळे ठेवावे, असे मी नेहमी म्हणत असतो. भारत आणि पाकिस्तानचे नागरिक एकमेकांचा खूप आदर करतात, असेही ते म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भारताचा रेकॉर्ड चांगला

आशिया कपच्या वनडे फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान 13 वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने 7 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने 5 सामने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला होता.

दरम्यान 2 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान संघ एकमेकांशी भिडणार आहेत. पलकेल्ले इंटरनेशनल क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना रंगणार आहे. दुपारी 3 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याची भारत-पाकिस्तानच्या चाहत्यांसह क्रिकेटप्रेंमींना उत्सुकता आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा:  Crime: डायबिटीज असतानाही सतत मिठाई खायची,वैतागून नवऱ्याने केली हत्या

    follow whatsapp

    ADVERTISEMENT