Asia Cup 2023 : कोहली, राहुलची तुफानी शतकी खेळी, पाकिस्तानसमोर ‘इतक्या’ धावांचे आव्हान
Ind vs Pak Asia Cup 2023 पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि के एल राहुलने शतकी खेळी केली आहे. या शतकी खेळीच्या बळावर 300 च्या पार भारताच्या धावसंख्या खेचून आणली आहे.
ADVERTISEMENT
Virat Kohli and Kl Rahul Century : पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि के एल राहुलने शतकी खेळी केली आहे. या शतकी खेळीच्या बळावर 350 च्या पार भारताच्या धावसंख्या खेचून आणली आहे. टीम इंडियाने 2 विकेट गमावून 356 धावा गाठल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानसमोर 357 धावांचे आव्हान असणार आहे. (ind vs pak virat kohli kl rahul century pakistan target asia cup super 4 match)
ADVERTISEMENT
रविवारी पावसामुळे भारत पाकिस्तान सामना थांबला होता. त्यावेळेस टीम इंडियाने 24.1 ओव्हरमध्ये 2 बाद 147 धावा केल्या होत्या. यावेळी राहुल 17 धावावर खेळत होता, तर विराट कोहलीने 8 धावा केल्या होत्या. त्यानंतर हा सामना सोमवारी रिझर्व्ह डेला संध्याकाळी 4.30 वाजता सूरू झाला.
हे ही वाचा :Lok Sabha Election 2024 : नितीश कुमारांची पुन्हा भाजपशी जवळीक? काय घडलं?
विराट कोहली आणि के एल राहुलने रिझर्व्ह डेच्या सामन्यात धुमाकुळ घातला. दोघांनी मिळून पाकिस्तानी बॉलर्सची अक्षरश धुलाई केली आहे. के एल राहुलने 106 बॉलमध्ये नाबाद 111 धावा केल्या. ज्यामध्ये 12 चौकार आणि 2 षटकार मारले. राहुल पाठोपाठ विराटचीही बॅट तळपली आणि त्याने देखील खणखणीत शतक ठोकलं. विराटने 94 बॉलमध्ये 122 धावाची खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकार लावले आहे. या दोघांच्या शतकी खेळीने भारताच्या धावसंख्या 350 च्या पार गेली आहे. विराट 122 आणि राहुलच्या 111 धावांच्या नाबाद खेळीच्या बळावर भारताने 2 विकेट गमावून 356 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानसमोर 357 धावांचे आव्हान असणार आहे.
हे वाचलं का?
दरम्यान रविवारी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी सलामीला उतरून दे दणादण फटकेबाजी केली होती. या दोघांनी 121 धावांची सलामी भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी अर्धशतकं ठोकली. मात्र त्यानंतर दोघेही सलग 2 ओव्हर्समध्ये आऊट झाले. शुबमनने 58 आणि रोहितने 56 धावा केल्या होत्या.
पाकिस्तानी बॉलर्सना आजही एकही विकेट काढता आला नाही, त्यामुळे काल घेतलेल्या विकेटनुसार शाहीन अफ्रिदी आणि शादाब खान या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. भारताने पाकिस्तानला 257 धावांचे आव्हान दिले आहे. हे आव्हान पुर्ण करून पाकिस्तान सामना जिंकते की भारत त्यांना रोखण्यास यशस्वी ठरतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा :Renu Sinha Murder : रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेह, सुप्रीम कोर्टातील वकिलाची कुणी केली हत्या?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT