IPL 2021 : CSK थाटात अंतिम फेरीत दाखल, रंगतदार सामन्यात दिल्लीवर मात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने दिल्लीवर अटीतटीच्या लढतीत ४ विकेटने मात करत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. मागच्या हंगामातील खराब कामगिरीनंतर चेन्नईने घेतलेली ही गरुडझेप कौतुकास्पद मानली जात आहे. दिल्लीला RCB vs KKR सामन्यातील विजेत्यासोबत खेळण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

ADVERTISEMENT

दिल्लीने विजयासाठी दिलेलं आव्हान चेन्नईने शेवटपर्यंत झंज देत पूर्ण केलं. ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा यांनी महत्वाची पार्टनरशीप करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली.

सामन्यात पहिल्यांदा बॅटींग करताना दिल्ली कॅपिटल्सने चांगली सुरुवात केली. पृथ्वी शॉने फटकेबाजी करत चेन्नईसमोर टेन्शन वाढवलं. परंतू जोश हेजलवूडने आधी शिखर धवन आणि नंतर श्रेयस अय्यरला आऊट करत दिल्लीला बॅकफूटवर ढकललं. यानंतर बढती मिळालेला अक्षर पटेलही मोईन अलीच्या बॉलवर मोठा फटका खेळताना आऊट झाला. पृथ्वी शॉ यादरम्यान एक बाजू लावून मैदानात उभा होता.

हे वाचलं का?

यानंतर मैदानात आलेल्या ऋषभ पंतने पृथ्वी शॉच्या साथीने संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी सुरेख फटकेबाजी करत दिल्लीची धावसंख्या वाढवली. पृथ्वी शॉने ३४ बॉलमध्ये ७ फोर आणि ३ सिक्स लगावत ६० रन्स केल्यानंतर जाडेजाने त्याला आऊट केलं. यानंतर पंत आणि हेटमायर यांनी फटकेबाजी सुरु ठेवत दिल्लीला १७२ धावांपर्यंत मजल मारुन दिली. कॅप्टन पंतने नॉटआऊट ५१ रन्सची इनिंग खेळली. चेन्नईकडून हेजलवूडने २ तर जाडेजा, अली आणि ब्राव्होने १-१ विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल चेन्नई सुपरकिंग्जची सुरुवात अडखळती झाली. नॉर्ट्जेने फाफ डु-प्लेसिसला क्लिन बोल्ड करत दिल्लीला पहिलं यश मिळवून दिलं. परंतू यानंतर रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड यांनी मोक्याच्या क्षणी महत्वाची पार्टनरशीप करत संघाचा डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी करताना दोन्ही फलंदाजांनी चेन्नईचं पारडं जड केलं. विशेषकरुन रॉबिन उथप्पाने आक्रमक पवित्रा घेत दिल्लीच्या बॉलर्सची धुलाई करत अर्धशतक झळकावलं.

ADVERTISEMENT

टॉम करनच्या बॉलिंगवर मोठा फटका खेळताना रॉबिन उथप्पा आऊट झाला. त्याने ४४ बॉलमध्ये ७ फोर आणि २ सिक्स लगावत ६३ रन्स केल्या. यानंतर दिल्लीने अचानक सामन्यात कमबॅक करत CSK च्या डावाला खिंडार पाडलं. बढती मिळालेला शार्दूल ठाकूरही टॉम करनच्या बॉलिंगवर भोपळाही न फोडता माघारी परतला. लागोपाठ अंबाती रायुडूही चोरटी धाव घेताना रनआऊट झाल्यामुळे चेन्नईचा संघ अचानक बॅकफूटला फेकला गेला. ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली यांनी फटकेबाजी करुन चेन्नईचं आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

परंतू अखेरच्या दोन ओव्हर्समध्ये चेन्नईला विजयासाठी २४ धावा हव्या असताना मैदानात स्थिरावलेला ऋतुराज गायकवाड माघारी परतला. अक्षर पटेलने त्याला सुरेथ कॅच घेतला, ऋतुराजने ५० बॉलमध्ये ५ फोर आणि २ सिक्स लगावत ७० धावा केल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये १३ रन्स हव्या असताना टॉम करनच्या बॉलिंगवर मोईन अली आऊट झाला. परंतू धोनीने यानंतर दोन चौकार लगावत सामन्यात रंगत आणली. अखेरीस विजयासाठी आवश्यक धावा पूर्ण करत धोनीने चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्त केलं. दिल्लीकडून टॉम करनने ३, नॉर्टजे आणि आवेश खानने १-१ विकेट घेतली. परंतू चेन्नईवर अंकुश लावण्यात ते अपयशी ठरले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT