IPLच्या विजेत्या, उपविजेत्या संघावर बक्षिसांची लयलूट! किती Prize Money मिळणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ipl 2023 prize money winning team and runner up csk vs gt ms dhoni hardik pandya
ipl 2023 prize money winning team and runner up csk vs gt ms dhoni hardik pandya
social share
google news

IPL 2023 Prize Money : आयपीएल (IPL 2023) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शुक्रवारी गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता फायनलची लढत रविवारी 28 मे रोजी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये (Chennai Super king) रंगणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे. दरम्यान या स्पर्धेत ट्रॉफी उंचावून विजयी ठरणाऱ्या संघाला किंवा उपविजेत्या संघाला नेमकी किती रक्कम मिळणार आहे? हे जाणून घेऊयात. (ipl 2023 prize money winning team and runner up csk vs gt ms dhoni hardik pandya)

आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या संघाला 20 करोड रूपयाची बक्षीस रक्कम मिळणार आहे. तर उपविजेत्या ठरणाऱ्या संघाला 13 करोड रूपये मिळणार आहे. इतकंच नाही स्पर्धेत तिसऱ्या आणि चौथ्या असणाऱ्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि लखनऊ सूपर जाएंट्सला देखील खुप चांगली बक्षीस रक्कम मिळणार आहे. यासोबतच प्रत्येक खेळाडूला त्याच्या वैयक्तिक कामगिरीवर देखील बक्षीस आणि पुरस्कार दिला जातो. या बक्षिसाची रक्कम किती आहे? ते पाहूयात.

हे ही वाचा : Akash Madhwal :MIचं सेमी फायनलचं तिकीट कापणारा आकाश माधवाल कोण?

किती बक्षीस रक्कम मिळते?

विजयी संघाला : 20 करोड रूपये
उप विजेत्या संघाला : 13 करोड रूपये
तिसऱ्या स्थानी (मुंबई इंडियन्स) : 7 करोड रूपये
चौथ्या स्थानी (लखनऊ सुपर जाएंट्स) : 6.5 करोड रूपये
इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट : 20 लाख रूपये
सुपर स्ट्राईकर ऑफ द सीजन : 15 लाख रूपये
ऑरेंज कप (सर्वाधिक धावा) : 15 लाख रूपये
पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट) : 15 लाख रूपये
मोस्ट वॅल्युबल प्लेयर ऑफ द सीजन : 12 लाख रूपये
सर्वाधिक सिक्सचा रेकॉर्ड : 12 लाख रूपये
गेम चेंजर ऑफ द सीजन : 12 लाख रूपये

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

IPL 2023 मध्ये सर्वाधिक धावा

शुबमन गिल (गुजरात टायटन्स) : 851 धावा
फॅफ डु प्लेसिस (रॉयल चॅंलेंजर्स बंगळुरू) : 730 धावा
विराट कोहली (रॉयल चॅंलेंजर्स बंगळुरू) : 639 धावा
डेवॉन कॉन्वे (चेन्नई सुपर किंग्ज) : 625 धावा
यशस्वी जायसवाल (राजस्थान रॉयल्स) : 625 धावा

हे ही वाचा : महेंद्र सिंह धोनी आणि रविंद्र जडेजामध्ये वाद शिगेला? नवीन व्हिडिओ आला समोर

IPL 2023 मध्ये सर्वाधिक विकेट

मोहम्मद शमी (गुजरात टायटन्स) : 28 विकेट
राशीद खान (गुजरात टायटन्स) : 27 विकेट
मोहित शर्मा (गुजरात टायटन्स) : 24 विकेट
पियुष चावला (मुंबई इंडियन्स) : 22 विकेट
युजवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स) : 21 विकेट

ADVERTISEMENT

दरम्यान आता रविवार 28 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super king) आणि गुजरात टायटन्समध्ये (Gujrat Titans) फायनल सामना खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT