Akash Madhwal :MIचं सेमी फायनलचं तिकीट कापणारा आकाश माधवाल कोण?

ADVERTISEMENT

ipl 2023 who is akash madhwal created history by taking 5 wicket
ipl 2023 who is akash madhwal created history by taking 5 wicket
social share
google news

Who is Akash Madhwal : आयपीएलमध्ये बुधवारी लखनऊ सुपर जाएंट्स (LSG) आणि मुंबई इंडियन्समध्ये (MI) एलिमिनेटर सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या आकाश मधवालने (Akash Madhwal) भेदक गोलंदाजी करत 5 विकेट घेऊन मुंबईच्या सेमी फायनलमध्ये दाखल होण्याचा मार्ग मोकळा केला. मुंबईच्या या विजयानंतर आकाश मधवालची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. इतकंच नाही तर एकाच सामन्यातील कामगिरीनंतर आकाश मधवालची तुलना दिग्गज गोलंदाज जयप्रीत बुमराहशी होऊ लागली आहे. त्यामुळे एकाच सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करून व रातो रात स्टार झालेला हा आकाश मधवाल नेमका आहे तरी कोण आहे? चला जाणून घेऊयात.
(ipl 2023 who is akash madhwal mumbai indians player created history by taking 5 wicket)

लखनऊ विरूद्धची कामगिरी

लखनऊ विरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या आकाशने 21 बॉल म्हणजे साडे तीन ओव्हर टाकून 5 धावा देत 5 विकेट्स घेतली होती. या त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे मुंबई इंडियन्स फायनलच्या दिशेने आणखीण एक पाऊल नजीक पोहोचला आहे. आकाशने 5 विकेट घेऊन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कारण प्लेऑफमध्ये 5 विकेट घेणारा आकाश हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याच्या या कामगिरीचे आता कौतूक होतेय.

कोण आहे आकाश?

आकाश मधवालचा जन्म 25 नोव्हेंबर 1993 मध्ये उत्तराखंडच्या रूडकीमध्ये झाला. त्याचे वडिल इंडिय़न आर्मीत होते. आकाशला लहानपणापासून क्रिकेटचे खास आकर्शन नव्हते.पण आकाशने इंजिनियरींग केली त्यानंतर त्याचा क्रिकेटमध्ये इंटरेस्ट वाढला. आकाश सुरुवातीला टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. त्यानंतर 24 वर्षाचा झाल्यानंतर त्याने पहिल्यांदा लेदर बॉलने खेळायला सुरूवात केली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

क्रिकेटच कोचिंगच घेतलं नाही…

आकाश मधवालने कधीच क्रिकेटच कोचिंग घेतलं नाही. एक दिवशी उत्तराखंडच्या टीमचे ट्रायल सुरु होते. या ट्रायलमध्ये तो अचानक पोहोचला. या दरम्यान आकाशचा खेळ पाहून कोच मनीष झा प्रभावित झाले होते. त्यामुळे त्याला संघात संधी मिळाली होती. त्यानंतर आकाशने प्रॅक्टीस करायला सुरुवात केली होती. आणि अशाप्रकारे आकाशच्या खेळात सुधार झाला होता.

2019 मध्ये फर्स्ट क्लास डेब्यू

आकाश मधवालने 2019 मध्ये उत्तराखंडसाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यू केला आहे.यावर्षी त्य़ाला 10 सामने खेळायची संधी मिळाली. या सामन्यात त्याने 12 विकेट घेतल्या होत्या. मधवालला ए लिस्ट सामन्यातही खेळायची संधी मिळाली. आकाशने 17 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या होत्या. आकाशने 8 नोव्हेंबर 2019 साली टी20 सामन्यात डेब्यू केला होता.

ADVERTISEMENT

29 वर्षाच्या आकाश मधवालला मुंबई इंडियन्सने 20 लाख रूपयांना रिटेन केले होते. गेल्या हंगामात आकाश मधवाल बदली खेळाडू म्हणून संघात स्थान दिले होते. मात्र त्याला एकाही सामन्यात खेळायची संधी मिळाली नव्हती. मात्र यावर्षी त्याला खेळायची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले होते.

ADVERTISEMENT

दरम्यान सध्या मुंबई सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना गुजरात टायटन्स विरूद्ध रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्स फायनलमध्ये पोहोचणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT