Pat Cummins : आयपीएलने केले मालामाल! ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ठरला सर्वात महागडा खेळाडू

ADVERTISEMENT

IPL Auction 2024 Pat Cummins broke all records became the most expensive player IPL history
IPL Auction 2024 Pat Cummins broke all records became the most expensive player IPL history
social share
google news

Pat Cummins IPL History highest price player all time: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2024 साठी खेळाडूंचा आज दुबईमध्ये लिलाव झाला. त्यामध्ये पॅट कमिन्सला (Patt Cummins) सनरायझर्स हैदराबादकडून (Sunrisers Hyderabad) 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्यामुळे पॅट कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कमिन्सला विकत घेण्यासाठी आरसीबीनेही (RCB) धडपड केली होती, पण त्यामध्ये सनरायझर्सनेच बाजी मारली. याच पॅट कमिन्सची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.

पॅट कमिन्स ठरला अव्वल

पॅट कमिन्सला विकत घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये बोलींचे अगदी जोरदार युद्ध रंगले होते. यामध्ये विशेष हे आहे की, पॅट कमिन्सने या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या दोन आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. पॅट कमिन्स हा WTC फायनल 2023 चा विजेता कर्णधारदेखील होता, तर अलीकडेच विश्वचषक 2023 फायनलचा विजेतादेखील पॅट कमिन्सच होता. त्यामुळे त्याच्यासाठी हे बोलीचे युद्ध रंगले होते.

हे ही वाचा >> IPL Auction 2024 Live : आयपीएलमध्ये आतापर्यंत 12 खेळाडूंचा लिलाव, कोणता खेळाडू कोणत्या संघात?

1. सॅम करन (18.50 कोटी रुपये): इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन हा आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. आयपीएल 2023 च्या लिलावात करनने इतिहास रचला होता. या वेगवान अष्टपैलू खेळाडूला पंजाब किंग्ज (PBKS)फ्रँचायझीने 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले असून करन सध्या पंजाब किंग्जचा भाग बनला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2. कॅमेरॉन ग्रीन (17.50 कोटी रुपये): सॅम करननंतर कॅमेरॉन ग्रीन हा खेळाडू लिलावात सर्वात महागडा ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या स्टार अष्टपैलू खेळाडूसाठी मुंबई इंडियन्सने (MI) 17.50 कोटींची बोली लावून विकत घेतले आहे. त्यामुळे आगामी आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)कडून तो खेळणार आहे.

3. बेन स्टोक्स (रु. 16.25 कोटी): इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार असलेला आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेन स्टोक्स हा आयपीएलच्या इतिहासातील चौथा सगळ्यात महागडा खेळाडू आहे. त्याला चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने IPL 2023 च्या लिलावात 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे आगामी आयपीएल हंगामातून स्टोक्सने माघार घेण्याचा निर्णयही घेतला होता.

ADVERTISEMENT

4. ख्रिस मॉरिस (16.25 कोटी रुपये): दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस हाही आयपीएलमधील चौथा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. आयपीएल 2021 च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने (RR) मॉरिसला 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्यानंतर मॉरिसने या प्रकरणात युवराज सिंगला मागे टाकले होते. युवराजला 2015 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने 16 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

ADVERTISEMENT

5. निकोलस पूरन (16 कोटी रुपये): कॅरेबियन क्रिकेटर निकोलस पूरन आयपीएलच्या लिलावामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. मागील आयपीएल लिलावामध्ये पूरनला लखनऊ सुपर जायंट्सने (एलएसजी) 16 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले होते. त्यामुळे आता पूरन पुढील आयपीएल हंगामामध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे.

युवराज सिंग ठरला महागडा

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग हा ही सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. युवराजला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 16 कोटींना विकत घेतले. मात्र, 2015 च्या सिझनमध्ये युवराज सिंगकडून काही विशेष कामगिरी करता आली नव्हती. त्याला 14 सामन्यांमध्ये 19 च्या सरासरीने केवळ 248 धावा करता आल्या होत्याय. तर त्यानंतर पुढच्या हंगामापूर्वी युवराजला फ्रँचायझीने सोडून दिले होते, तर युवराजनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला होता.

सर्वात महागडे भारतीय खेळाडू

1. युवराज सिंग (16 कोटी)
2. इशान किशन (15.25 कोटी)
3. गौतम गंभीर (रु. 14.90 कोटी)
4. दीपक चहर (रु. 14 कोटी)
5. दिनेश कार्तिक (रु. 12.50 कोटी)

हे ही वाचा >> छगन भुजबळ कुटुंबासह ‘त्या’ मोठ्या प्रकरणातून सुटले, कोर्टाने काय दिला निकाल?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT