IND vs BAN 2nd Test : टीम इंडियात होणार मोठे बदल! 'हा' दिग्गज होणार बाहेर? जाणून घ्या Playing XI चं समीकरण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Team India Playig XI Against Bangladesh
India vs Bangladesh 2nd Test Latest News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारत विरुद्ध बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्यात कोणत्या खेळाडूंना मिळणार संधी?

point

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा काय मोठे निर्णय घेणार?

point

'अशी' आहे टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11

India Probable 11 vs Bangladesh : भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेश विरद्ध 280 धावांनी दमदार विजय मिळवला. अश्विन आणि जडेजाने पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरी केली. अश्विनने अप्रतिम फलंदाजी करून 113 धावांची खेळी केली होती. तसच सहा विकेट्स घेण्याची कमालही केली. अश्विनला प्लेयर ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करण्यात आलं. अशातच भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात प्लेईंग 11 मध्ये बदल होऊ शकतो. (The second test match will be played between India and Bangladesh in Kanpur. In the first test match of the series, India won against Bangladesh by scoring 280 runs)

दुसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवला संधी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पहिल्या टेस्टमध्ये कुलदीप यादवला प्लेईंग 11 संधी देण्यात आली नव्हती. पण कानपूरची खेळपट्टी फिरकीपटूंना पोषक असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे कुलदीप यादवला दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.

अक्षर पटेल की कुलदीप यादव?

कानपूरच्या कसोटी सामन्यात टीम मॅनेजमेंटने बदल केल्यास हे दोन्ही खेळाडू दावेदार होऊ शकतात. अक्षर पटेल एख शानदार अष्टपैलू खेळाडू आहे. अक्षरने नेट्समध्ये अश्विन आणि रविंद्र जडेजासोबत गोलंदाजी केली, तसच कुलदीप, सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांच्यासोबत क्षेत्ररक्षणाचा सरावही केला. नेट्समध्ये कुलदीप यादवने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतला गोलंदाजी दिली होती. अशातच जर रोहित शर्माने प्लेईंग 11 मध्ये बदल करण्याचा विचार केला, तर रोहितची पसंत कुलदीप की अक्षर असणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Mumbai Rains: मुंबईत धो धो बरसला! कुठे कुठे दैना झाली? पाहा सर्व Video एका क्लिकवर

टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये फिरकीपटूंना मिळणार संधी?

कानपूरच्या खेळपट्टीचा विचार केल्यास रोहित शर्मा तीन फिरकीपटूंसोबत मैदानात उतरू शकतो. अशातच कुलदीपचं कमबॅक होऊ शकतं. भारताकडे अश्विन आणि जडेजा आहेतच. अशातच आकाशदीप आणि सिराज यांच्यापैकी एकाला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळू शकते.

सिराज किंवा आकाशदीप

कुलदीप आणि अक्षर यांच्यापैकी एकाला संधी मिळाली, तर आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यापैकी एक खेळाडूला बाहेर बसावं लागेल. पहिल्या कसोटी सामन्यात आकाशने आपल्या गोलंदाजीनं प्रभावित केलं. आकाश एक युवा गोलंदाज आहे आणि मॅनेजमेंटने त्याला आणखी संधी दिली पाहिजे. हे समीकरण पाहता सिराज इलेव्हनमधून बाहेर होऊ शकतो.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Horoscope In Marathi : कुंभ राशीने संपत्तीबाबत सतर्क राहा! मेष राशीच्या लोकांना पार्टनरकडून आनंदाची बातमी मिळेल, पण इतर राशींनी...

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत, केएल राहुल, रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव/अक्षर पटेल, मोहम्मद सिराज/आकाशदीप, जसप्रीत बुमराह
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT