MCA Election: एकनाथ शिंदे म्हणाले “थोडीशी बॅटिंग करून तीन महिन्यांपूर्वी एक मॅच जिंकली”
MCA Election: एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक गुरूवारी होणार आहे. या निमित्ताने झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज एकाच मंचावर आलेले पाहण्यास मिळालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास आपल्या स्टाईलमध्ये भाषण करत थोडी थोडी बॅटिंग आम्हालाही येते असं म्हणत तीन महिन्यापूर्वी घडलेल्या सत्तांतराच्या घटनेला उजाळा दिला. […]
ADVERTISEMENT
MCA Election: एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक गुरूवारी होणार आहे. या निमित्ताने झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज एकाच मंचावर आलेले पाहण्यास मिळालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास आपल्या स्टाईलमध्ये भाषण करत थोडी थोडी बॅटिंग आम्हालाही येते असं म्हणत तीन महिन्यापूर्वी घडलेल्या सत्तांतराच्या घटनेला उजाळा दिला.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे एकनाथ शिंदे यांनी?
MCA च्या अध्यक्षपदासाठी निवडणूक गुरूवारी होते आहे. अशात ही निवडणूक पवार-शेलार पॅनल कशी जिंकेल यावर सगळ्यांनी लक्ष केंद्रीत करा असं आवाहन केलं. त्याचप्रमाणे आम्हालाही थोडी थोडी बॅटिंग करता येते. तीन महिन्यांपूर्वी आम्ही बॅटिंग केली आणि मॅच जिंकली असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी तीन महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतराची आठवण काढली. तसंच जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळाली की आम्हाला बॅटिंग करता येते. एकनाथ शिंदे यांनी हे वाक्य उच्चारताच आम्हालाही कॅच पकडता येतो हे लक्षात असूद्या असं शरद पवार म्हणाले.
सगळ्यांच्या आशीर्वादाने तीन महिन्यांपूर्वीची मॅच जिंकलो
आम्ही सगळ्यांच्या आशीर्वादाने तीन महिन्यांपूर्वीची मॅच जिंकली. आम्हाला मिळालेले आशीर्वाद सगळ्यांचेच होते. काहींचे उघडपणे होते तर काहींचे मागून होते पण मनापासून होते. जेव्हा चांगलं काम होणार असतं तेव्हा त्याला शरद पवार साथ देत असते. बीकेसीच्या सभेबाबतही शरद पवारांनी भाष्य केलं.त्यावर मी फार काही बोलणार नाही पण इतकंच सांगेन की आपल्या मनाप्रमाणे सगळं झालं. अंधेरीची निवडणूकही आपल्या सांगण्याप्रमाणे झाली.
हे वाचलं का?
महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे
आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आणि परंपरा आहे. अशी वेळ आल्यानंतर ते राजकारणाच्या पलिकडे जाऊन त्यांचं मत व्यक्त करत असतात. शरद पवारांचा राजकारणातला अनुभव प्रचंड दांडगा आहे. त्यामुळे आम्ही सगळेच त्यांचं ऐकतो.
आज काही लोकांची झोप उडाली असेल
शिंदे-पवार हे त्यांनी सांगितलं ते ऐकून मला आनंद झाला, देवेंद्र फडणवीस यांना आनंद झाला. इथे असलेल्यांनाही आनंद झाला. पण काही लोकांना हे आवडलं नसेल असं म्हणत नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. काही लोकांची झोप उडू शकते असंही त्यांनी म्हटलं आहे. आजचं व्यासपीठ राजकारणाचं नाही. खेळात राजकारण आणायचंच नाही आपल्याला. राजकारण असतं तर एवढे लोक व्यासपीठावरच नसते असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच निवडणूक महत्त्वाची आहे जे उमेदवार आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT