‘निवृत्ती घेण्यासाठी ही योग्य वेळ’, IPL 2023 जिंकल्यानंतर महेंद्रसिंह धोनीची मोठी घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

ms dhoni big announcement on his retirement i will play one more season after defeat gujrat titans ipl 2023
ms dhoni big announcement on his retirement i will play one more season after defeat gujrat titans ipl 2023
social share
google news

Mahendra Singh Dhoni On Retirement : कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super king) सोमवारी आपयीएल 2023 च्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे.. अशाप्रकारे धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरण्याची किमया केली. या विजयाची चेन्नईच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असतानाच काहीशी नाराजी देखील आहे. कारण त्याचा आवडता खेळाडू धोनी आयपीएलनंतर निवृत्ती जाहीर करणार होता.मात्र आता या निवृत्तीवरून त्याने मोठं विधान केले आहे. धोनीच्या या विधानानंतर तो आणखीण एक आयपीएल सीजन खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(ms dhoni big announcement on his retirement i will play one more season after defeat gujrat titans)

निवृत्तीवर काय म्हणाला धोनी?

आयपीएल 2023 (IPL 2023) वर चेन्नईने नाव कोरल्यानंतर हर्षा भोगले यांनी धोनीची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) भविष्यातील पुढच्या वाटलीवर प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना महेंद्र सिंह धोनी म्हणाला की, निवृत्ती घेण्याची हीच सर्वांत उत्तम वेळ आहे. त्यामुळे माझ्यासाठी खुप सोप्प आहे की धन्यवाद बोलून निवृत्ती घ्यावी. पण माझ्यासाठी हे खुप कठीण काम असल्याचे तो म्हणतोय. नऊ महिने आणखीण कसून मेहनत करून आणखीण एक आयपीएल सीजन खेळण्याच्या प्रयत्न करेन. फक्त शरीर साथ द्यायला हवे, असे विधान करून धोनीने आणखीण आयपीएल सीझन खेळण्याचे संकेत दिले आहेत.

हे ही वाचा : IPL 2023, CSK vs GT Final: गुजरातला कशी चारली धूळ, चेन्नईच्या विजयाची 5 कारणे

चेन्नईच्या फॅन्सकडून जितकं प्रेम मिळालं आहे, त्यानुसार आणखीण एक आयपीएल सीझन खेळण चाहत्यांसाठी मोठं गिफ्ट आहे. मला त्यांच्यासाठी हे करावच लागेल. हा माझ्या करीअरचा शेवटचा टप्पा असेल, असे देखील धोनी म्हणतो. माझी इथुनच सुरुवात झाली होती आणि संपूर्ण स्टेडियम माझ्या नावाचा जयघोष करत होता. चेन्नईतही असेच घडले आहे, आता परत येऊन मला जमेल तेवढे खेळणे चांगले वाटेल, असे म्हणत निवृत्ती ऐवजी त्यांनी पुन्हा मैदानात सक्रिय राहण्याची माहिती दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मी ज्या प्रमाणे क्रिकेट खेळतो, त्याप्रमाणे त्यांना देखील तसेच खेळता येईल असे वाटते. अजिंक्य अनुभवी आहे, तर युवा खेळाडू गोंधळलेले आहेत. अशावेळी आम्ही त्यांच्याशी बोलतो, असे धोनीने सांगितले आहे. रायडू मैदानावर असला की तो त्याचे 100 टक्के देण्याचा प्रयत्न करतो.आम्ही भारत अ साठी एकत्र खेळलो आहे. तो स्पिन आणि फास्ट गोलंदाजांना चांगला खेळतो. मला नेहमी असे वाटायचे तो काहीतरी खास करेल. तो माझ्यासारखाच आहे, स्मार्टफोनचा जास्त वापर करत नाही, असे देखील धोनी म्हणाला आहे.

असा रंगला सामना

चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. त्यामुळे गुजरात प्रथम फलंदाजीला उतरली होती. वृद्धिमान साहा आणि शुबमन गिलने गुजरातला चांगली सुरुवात करून दिली होती.साहाने 54 तर शुबमन गिल 39 धावा करून बाद झाला होता.त्यानंतर इम्पॅक्ट प्लेयरच्या रूपात मैदानात उतरलेल्या साई सुदर्शनने मैदानात धावांचा पाऊस पाडला. 47 धावात त्यांनी 97 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 6 षटकार ठोकले होते. या धावांच्या बळावर गुजरात टायटन्सने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 214 धावांचा डोंगर उभारला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : IPLच्या विजेत्या, उपविजेत्या संघावर बक्षिसांची लयलूट! किती Prize Money मिळणार?

215 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या चेन्नईच्या दुसऱ्या डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये पाऊस पडला. त्यामुळे अनेक तास खेळ थांबवावा लागला. नंतर ड़कवर्थ लुईस नियमानुसार 15 ओव्हरमध्ये 171 धावांचे चेन्नईसमोर लक्ष होते. या दरम्यान कधी मॅच गुजरातच्या तर कधी चेन्नईच्या पारड्यात होती.त्यामुळे कोण जिंकत याची उत्सुकता होती. अखेर शेवटच्या दोन बॉलमध्ये 10 धावांची गरज असताना रविंद्र जडेजाने एक षटकार आणि चौकार मारून गुजरातच्या हातचा विजय खेचून आणला होता. अशाप्रकारे चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT