T20 World Cup : ICC स्पर्धा न जिंकल्याचं दुःख आहेच पण पश्चाताप नाही – माजी प्रशिक्षक रवी शास्त्री
नुकत्याच युएईत पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आलं. या पराभवानंतर विराट कोहलीसह प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपलेला आहे. टीम इंडियाच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी राहुल द्रविड भारताचा प्रशिक्षक असणार आहे. या निमीत्ताने रवी शास्त्री यांनी इंडिया टुडेला खास मुलाखत दिली. यात बोलत असताना शास्त्री यांनी ICC स्पर्धा न जिंकल्याचं दुःख […]
ADVERTISEMENT
नुकत्याच युएईत पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आलं. या पराभवानंतर विराट कोहलीसह प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपलेला आहे. टीम इंडियाच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी राहुल द्रविड भारताचा प्रशिक्षक असणार आहे. या निमीत्ताने रवी शास्त्री यांनी इंडिया टुडेला खास मुलाखत दिली. यात बोलत असताना शास्त्री यांनी ICC स्पर्धा न जिंकल्याचं दुःख जरुर आहे पण पश्चाताप नाही असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
आपल्या कार्यकाळात टीम इंडिया परदेशातही जाऊन मालिका जिंकू शकतो हा विश्वास निर्माण झाल्याचा आपल्याला अभिमान असल्याचं शास्त्री यांनी सांगितलं. विराट कोहलीप्रमाणे रवी शास्त्रीही टीम इंडियाला प्रशिक्षक म्हणून आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद मिळवून देऊ शकले नाहीत.
INDvsNZ Tests: कोहलीबरोबर रोहित शर्मालाही विश्रांती; कसोटी संघाचं नेतृत्व मुंबईकर अजिंक्य रहाणेकडे
हे वाचलं का?
“मला कशाचाही पश्चाताप नाही, गेली पाच वर्ष भारतीय संघ ज्या पद्धतीने खेळतो आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. ऑस्ट्रेलियातला भारतीय संघाने मिळवलेला विजय नजरअंदाज करता येणार नाही. ऑस्ट्रेलियात मिळवलेले लागोपाठ विजय हे अविश्वसनिय होते. आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही याचं दुःख नक्कीच आहे पण पश्चाताप नाही. आम्ही एक नाही दोन स्पर्धा जिंकू शकलो असतो, पण तसं झालं नाही. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये गोष्टी काही क्षणांमध्ये बदलत जातात. जर तुमची सुरुवातच चांगली झाली नाही तर तुम्ही लगेच मागे पडू शकता आणि वर्ल्डकपमध्ये हेच झालं.”
मुंबई पोलिसांनी कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्याला ठोकल्या बेड्या
ADVERTISEMENT
रवी शास्त्रींचा कार्यकाळ संपल्यानंतर टीम इंडिया १७ नोव्हेंबरला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध ३ टी-२० आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच असणार असून टी-२० संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे तर पहिल्या कसोटीसाठी संघाचं नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT