T20 World Cup 2024 : टीम इंडियाला मोठा झटका, फायनल आधीच 'हा' क्रिकेटर दुखापतग्रस्त
India Vs Afganistan : टीम इंडियाने (Team India) सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर आता टीम इंडियाचा सुपर 8 मधला पहिला सामना अफगाणिस्तान (Afganistan) विरूद्ध रंगणार आहे. हा सामना 20 जूनला होणार आहे.
ADVERTISEMENT
Surykumar Yadav Injured : टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) सध्या टीम इंडिया चांगलीच फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने (Team India) सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर आता टीम इंडियाचा सुपर 8 मधला पहिला सामना अफगाणिस्तान (Afganistan) विरूद्ध रंगणार आहे. हा सामना 20 जूनला होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. कारण टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटर सुर्यकुमार यादव (Surykumar Yadav) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. (suryakumar yadav injured during team india practice session t20 world cup 2024 Super 8 match against afganistan)
ADVERTISEMENT
येत्या 20 जुनला टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. या सामन्यापुर्वी भारतीय खेळाडू नेट्समध्ये सराव करत आहेत. या सरावा दरम्यान टीम इंडियाचा फलंदाज सुर्यकुमार यादवला दुखापत झाली आहे. सुर्यकुमार यादव थ्रोडाऊनचा सामना करत असताना बॉल त्याच्या हाताला लागला होता. त्यावेळेस सुर्याला फार दुखापत होत असल्याचे दिसले होते. यानंतर फिजिओने सूर्याला तत्काळ उपचार दिले होते. या दरम्यान एक दिलासादायक बाब म्हणजे, सूर्याची दुखापत फारशी गंभीर नव्हती. पेनकिलर स्प्रेनंतर सूर्याने पुन्हा चार्ज घेतला आणि फलंदाजी केली होती.
हे ही वाचा : Maharashtra MLC Election : 11 जागांसाठी निवडणूक जाहीर, ठाकरे-पवारांची विधानसभेपूर्वी 'परीक्षा'?
दरम्यान मैदानावर ज्यावेळेस सूर्याला दुखापत झाली तेव्हा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड खूप तणावात दिसले होते. यावेळी द्रविडने सूर्या आणि फिजिओ दोघांशीही चर्चा केली होती. त्यानंतर त्यांच्या जीवात जीव आला होता. सुर्याने अमेरिके विरुद्धच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात कठीण परिस्थितीत नाबाद अर्धशतक झळकावून संघाला विजयाकडे नेले होते. या विजयानंतर भारतीय संघाने सुपर-8 मध्ये स्थान मिळवले. तर याआधीच्या आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये सूर्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र आता सुपर 8 आणि फायनल सामन्यात टीम इंडियाला सुर्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.
हे वाचलं का?
टीम इंडियाचा संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंडित आणि हार्दिक पंड्या
राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान
ADVERTISEMENT
हे ही वाचा : लोखंडी पानाने डोक्याचा चेंदामेंदा, भररस्त्यात प्रेयसीची निर्घृण हत्या; वसई हादरली!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT