T-20 World Cup : …म्हणून तुम्ही आमच्याविरुद्ध जिंकत नाही ! ‘विरु’ने काढला पाकिस्तानला चिमटा
टी-२० विश्वचषकात बहुचर्चित भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. भारत-पाक सामन्याचा ज्वर संपूर्ण क्रिकेट जगतासह चाहत्यांवरही चढलेला आहे. या सामन्याआधी नेहमीप्रमाणे पाकिस्तानी माजी खेळाडूंनी भारताला डिवचायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ भारताला एकदाही हरवू शकला नाहीये. यंदा २४ तारखेला दुबईत हा सामना रंगेल. अशा परिस्थितीत भारताच माजी […]
ADVERTISEMENT
टी-२० विश्वचषकात बहुचर्चित भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. भारत-पाक सामन्याचा ज्वर संपूर्ण क्रिकेट जगतासह चाहत्यांवरही चढलेला आहे. या सामन्याआधी नेहमीप्रमाणे पाकिस्तानी माजी खेळाडूंनी भारताला डिवचायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ भारताला एकदाही हरवू शकला नाहीये.
ADVERTISEMENT
यंदा २४ तारखेला दुबईत हा सामना रंगेल. अशा परिस्थितीत भारताच माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने आतापर्यंत पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध एकही सामना का जिंकू शकला नाही याचं कारण सांगितलं आहे.
T-20 World Cup : भारताला हरवायचंय? मग हे कराच…जावेद मियाँदादचा पाकिस्तान संघाला सल्ला
हे वाचलं का?
सेहवागच्या म्हणण्यानुसार भारत-पाक सामन्याआधी पाकिस्तानचा संघ हा फक्त मोठी-मोठी विधानं करण्यात व्यस्त असतो. दुसरीकडे भारतीय संघाचं लक्ष हे केवळ आपल्या तयारीवर असतं. याच कारणामुळे भारत प्रत्येकवेळी या सामन्यातला दबाव चांगल्या पद्धतीने हाताळतो.
“मी २००३ आणि २०११ च्या वर्ल्डकपबद्दल बोलायला गेलो तर त्यावेळी आम्हाला खरंच फारशी चिंता नव्हती. कारण पाकिस्तानच्या तुलनेत आम्ही वरचढ होतो. माझ्यामते आपण कधीच मोठी-मोठी वक्तव्य करत बसत नाही. याउलट पाकिस्तानी संघ असो किंवा इतर खेळाडू-व्यक्तींकडून नेहमी मोठीमोठी विधान केली जातात. भारत असं कधीच करत नाही कारण त्यांची तयारी ही चांगली असते. ज्यावेळी तुमची तयारी चांगली झालेली असते त्यावेळी निकाल काय लागणार हे तुम्हाला माहिती असतं.”
ADVERTISEMENT
भारत आणि पाकिस्तानविरुद्ध यांच्यात सध्या दहशतवादाच्या मुद्द्यावरुन द्विपक्षीय मालिका खेळवल्या जात नाहीत. त्यामुळे वर्ल्डकप स्पर्धेत हे दोन्ही संघ समोरासमोर येतात. आतापर्यंत झालेल्या लढतींमध्ये भारताचं पारडं नेहमी पाकिस्तानच्या वरचढ राहिलेलं आहे. त्यामुळे यंदाच्या लढतीत कोण बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
T-20 World Cup : पाकिस्तान वठणीवर, अधिकृत जर्सीवर लिहीलं भारताचं नाव
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT