Vinesh Phogat Verdict : विनेश फोगाटला सिल्व्हर पदक मिळणार? 'या' दिवशी येणार निकाल
Vinesh Phogat Appeal : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम सामना होण्याआधी जास्त वजन भरल्याने बाहेर झाली. पण, तिला रौप्य पदक मिळणार की नाही? याकडे सगळ्याचे लक्ष आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
विनेश फोगाटच्या मागणीवर कोर्ट काय देणार निकाल?
सिल्व्हर पदक देण्याची विनेश फोगाटची मागणी
ऑस्ट्रेलियाचे न्यायमूर्ती देणार निकाल
Vinesh Phogat Verdict Latest : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये विनेश फोगाटला सिल्व्हर पदक मिळणार की नाही, याबद्दलचा निकाल आणखी पुढे गेला आहे. शुक्रवारी म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण झाली. १० ऑगस्ट रोजी निकाल येणे अपेक्षित होते, पण निकाल लांबला आहे. आता निकालासाठी नवी तारीख निश्चित झाली आहे. (Vinesh Phogat Silver Medal Case Updates)
ADVERTISEMENT
विनेश फोगाट सिल्व्हर मेडल; कधी येणार निकाल?
कुस्तीपटू विनेश फोगाटला सिल्व्हर मेडल मिळणार की नाही, याबद्दलचा निकाल लवकरच दिला जाणार आहे. मंगळवारी म्हणेजच १३ ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९.३० वाजता दिला जाणार आहे.
हेही वाचा >> ''ये जो, है जो, काय...सुपारी थूक तोंडातली'', ठाकरेंकडून शिंदेंची मिमिक्री
विनेश फोगाटच्या प्रकरणात ऑस्ट्रेलियाचे न्यायाधीश देणार निकाल
डॉ. एनाबेले बेनेट एसी.एससी या प्रकरणावर निकाल देणार आहे. सीएएसने (Court of Arbitration For Sports) आधी १० ऑगस्ट ही तारीख निकाल देण्यासाठी निश्चित केली होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९.३० वाजता निकाल सुनावला जाणार होता.
हे वाचलं का?
हेही वाचा >> शिंदेंच्या आमदाराचा महायुतीलाच घरचा आहेर
विनेश फोगाटने बुधवारी म्हणजे ७ ऑगस्ट रोजी अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरवण्याच्या आणि सिल्व्हर पदक देण्याची मागणी सीएसकडे केली होती. ऑलिम्पिक खेळादरम्यान निर्माण झालेले वाद सोडवण्यासाठी सीएस स्थापन केलेली आहे.
महावीर फोगाट काय म्हणाले?
विनेश फोगाटच्या सिल्व्हर पदकाबद्दलचा निकाल लांबणीवर गेला. याबद्दल बोलताना विनेश फोगाटचे काका महावीर फोगाट म्हणाले की, "आम्ही दोन दिवसांपासून वाट बघत आहोत. मी भारत सरकारचा आभारी आहे, ज्यांनी चांगल्या वकिलांची नियुक्ती केली. मला आशा हे की, चांगली बातमी मिळेल. आपण सुवर्ण पदकापासून वंचित राहिलो, पण लोक प्रार्थना करताहेत की, विनेशला सिल्व्हर पदक मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य विनेशला तिचा निर्णय बदलण्यास सांगणार", असे महावीर फोगाट यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT