Taliban च्या राजवटीत काय असेल अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचं भवितव्य?

मुंबई तक

सध्या संपूर्ण जगाच्या नजरा या अफगाणिस्तानकडे लागल्या आहेत. तालिबानी अतिरेक्यांनी राजधानी काबुलवर मिळवलेला ताबा, राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडून केलेलं पलायन यामुळे अफगाणिस्तानात सध्या हाहाकार सुरु आहे. तालिबानच्या जुलमी राजवटीत रहायचं नसल्यामुळे लोकं मिळेल त्या मार्गाने देश सोडून जायच्या तयारीत आहे. अफगाणिस्तानच्या या सत्तासंघर्षात एक मुद्दा प्रामुख्याने समोर आलाय. तो म्हणजे तालिबानच्या आक्रमणानंतर आता […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

सध्या संपूर्ण जगाच्या नजरा या अफगाणिस्तानकडे लागल्या आहेत. तालिबानी अतिरेक्यांनी राजधानी काबुलवर मिळवलेला ताबा, राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडून केलेलं पलायन यामुळे अफगाणिस्तानात सध्या हाहाकार सुरु आहे. तालिबानच्या जुलमी राजवटीत रहायचं नसल्यामुळे लोकं मिळेल त्या मार्गाने देश सोडून जायच्या तयारीत आहे. अफगाणिस्तानच्या या सत्तासंघर्षात एक मुद्दा प्रामुख्याने समोर आलाय. तो म्हणजे तालिबानच्या आक्रमणानंतर आता अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचं काय होणार??

अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे राशिद खान. छोट्या चणीच्या या बॉलरने संपूर्ण जगभरात आपलं नाव कमावलं आहे. आयपीएल, बिग बॅश लिग, कॅरेबिअन प्रिमीअर लिग, हंड्रेड यासारख्या अनेक स्पर्धांमध्ये राशिद खान खेळतो. सध्या हंड्रेट या लिगमध्ये खेळत असलेल्या राशिद खानने काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटरवरुन जागतिक पातळीवरच्या नेत्यांना अफगाणिस्तानमधला हा रक्तपात थांबवण्याची विनंती केली होती.

एरवी युद्धाच्या छायेत असलेल्या अफगाणिस्तानात गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेट चांगलंच वाढलं. काही महत्वाच्या भागांमध्ये तयार करण्यात आलेली क्रिकेट मैदानं आणि सराव शिबीरं यांच्यामुळे अफगाणी युवकांना क्रिकेटच्या रुपाने आपलं टॅलेंट दाखवण्याची एक संधी मिळाली. परंतू सध्याच्या घडीला…अफगाणिस्तानतली सर्व क्रिकेट स्टेडीअम ही तालिबानच्या हातात आलेली आहेत.

हे वाचलं का?