cjp student protest bollywood celebrities support : नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांविरोधात सुरू असलेल्या CJPच्या आंदोलनाला आता बॉलिवूडमधूनही मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. अभिनेता इम्रान खान बुधवारी मुंबईतील विद्यार्थी मोर्चात सहभागी झाला. पावसात शेकडो विद्यार्थ्यांसोबत चालत त्याने आंदोलकांची भेट घेतली, त्यांच्यासोबत सेल्फी काढले आणि त्यांच्याशी संवाद साधला. आंदोलनादरम्यान एका स्वतंत्र पत्रकाराशी बोलताना इम्रान खान म्हणाला की, "कठोर परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीला नाकारण्यात आले. त्यांच्या पाठिंब्यासाठी मी येथे आलो आहे. हा आपल्या देशाच्या भविष्यासाठीचा लढा आहे. भारतमातेची सर्व मुले आज येथे उभी आहेत."
ADVERTISEMENT
हेही वाचा : UK तून मराठी तरुण थेट दिल्लीत.. आंदोलनात इंग्लिशमध्ये धडाधड काय बोलला?
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि आलिया भटने घेतली भूमिका
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही आंदोलनाला पाठिंबा दर्शवत 20 जुलैच्या आंदोलनातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. त्या पोस्टमध्ये तिने, "20 जुलै रोजी अनेकांची हाडे तुटली आणि संपूर्ण देशाचे हृदय तुटले. हे लक्षात ठेवा," असे लिहित आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. आलिया भट्टनेही विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम करत, "गेल्या काही दिवसांपासून माझे ह्रदय वारंवार तुटले. प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक स्वप्न, एका कुटुंबाची आशा आणि असंख्य त्याग दडलेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांकडून... भविष्य त्यांचेच आहे. जय हिंद," असा संदेश दिला.
हेही वाचा : पुणे हादरले, 23 वर्षांपूर्वीच्या वडिलांच्या खुनाचा घेतला सूड; 28 वार करून हत्या, धक्कादायक उलगडा
नसीरुद्दीन शाह यांनी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांना 'गुंडे' संबोधले
अभिनेत्री वाणी कपूरनेही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत, "या संपूर्ण काळात माझे मन तरुणांसोबत आहे. ते ज्या धैर्याने, आशेने आणि विश्वासाने आपल्या भविष्यासाठी एकत्र उभे आहेत, ते अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या भावना समजून घेतल्या जाव्यात आणि त्यांचे म्हणणे ऐकण्याची खरी तयारी असावी, अशी माझी अपेक्षा आहे," असे म्हटले. दरम्यान, अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी जंतर-मंतरवरील 'चलो संसद' मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारावर प्रतिक्रिया देत मारहाण करणाऱ्यांना 'गुंडे' संबोधले. तसेच NEET पेपर लीकविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
अभिनेते प्रकाश राज हे सुरुवातीपासूनच CJPच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या प्रमुख कलाकारांपैकी एक आहेत. त्यांनी जूनमध्ये बंगळुरूमधील आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर नवी दिल्लीतील 'चलो संसद' मोर्चातही ते सहभागी झाले. आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये, "माझ्या देशातील तरुण त्यांच्या भविष्यासाठी लढत आहेत. स्वातंत्र्यलढ्यासारखी एक चळवळ पुन्हा उभी राहत आहे. या संघर्षात मी त्यांच्यासोबत उभा राहीन, त्यांना माझी ताकद देत राहीन आणि त्यांच्या भविष्यासाठी त्यांचा हात धरून राहीन," असे म्हटले. दरम्यान, अभिनेत्री आयशा खानने आंदोलनात सहभागी होताना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा केला. तसेच यश आणि तारा सुतारियाच्या 'टॉक्सिक' चित्रपटातील 'मदहोश' गाण्याची आणि त्यातील दोघांच्या केमिस्ट्रीचीही दिवसभर चर्चा रंगली.
ADVERTISEMENT












