Sushma Andhare : उद्धव ठाकरेंकडून 2 नेत्यांची हकालपट्टी, अंधारे म्हणाल्या…
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बीडचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव पाटील आणि जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली. दरम्यान, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी बीडमध्ये झालेल्या घटनेनंतर भूमिका मांडली.
ADVERTISEMENT

Sushma Andhare Video : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारेंना मारहाण झाल्याच्या एका घटनेनं खळबळ उडाली आहे. बीडमध्ये ठाकरे गटातील अंतर्गत कलह शिगेला जाऊन वाद झाला. शनिवारी महाप्रबोधन यात्रेची सभा होत असून, त्यापूर्वीच हा वाद भडकला. या प्रकरणात आता उद्धव ठाकरेंनी बीड जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुखांची हकालपट्टी केली आहे. दरम्यान, पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंना चापट मारल्याचा दावा केला. त्यावर अंधारेंनी झालेली घटना सांगत बाजू मांडली आहे.
बीडमध्ये ठाकरे गटात गुरुवारी (18 मे) वाद झाला. या वादानंतर बडतर्फ करण्यात आलेले जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी दावा केला की, “मी सुषमा अंधारेंना दोन चापटा मारल्या.” या घटनेनंतर उद्धव ठाकरेंनी आप्पासाहेब जाधव यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांचीही तडकाफडकी हकालपट्टी केली.
हेही वाचा >> ‘सुषमा अंधारेंना दोन चापटा लगावल्या’, ठाकरे गटात वादाची ठिणगी; काय घडलं?
आप्पासाहेब जाधव, धोंडू पाटील यांची हकालपट्टी
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव खासदार विनायक राऊत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दोघांची हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती दिली. ‘बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील व जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे”, अशी माहिती राऊत यांनी दिली.

सुषमा अंधारेंनी फेसबुक लाईव्ह करत मांडली बाजू
“आमच्याच पक्षातील जिल्हाप्रमुख अर्थात अस्तीनीतील साप अप्पा जाधव याने काहीतरी लाईव्ह येऊन व्हिडिओ जाहीर केला आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एक संभ्रम तयार करण्यासाठी आणि महाप्रबोधन यात्रेची 20 मे रोजी ग्रामीण महाराष्ट्रातील समारोपीय सभेला गालबोट लावण्यासाठी हा सगळा बनाव केला.”