Ganpat Gaikwad : “ज्यांना गद्दारी करून…”, भाजप आमदाराचे श्रीकांत शिंदेंच्या वर्मावर बोट
ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवर पक्षासोबत गद्दारी केल्याचे आरोप केले जात आहे. पण, आता भाजप आमदारानेच गद्दारी केल्याचे म्हटल्याने दोन्ही बाजूने वाद वाढण्याची चिन्हे आहेत.
ADVERTISEMENT

Ganpat Gaikwad Shrikant Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजप आमदाराने थेट गद्दार म्हटले. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना राजकीय संघर्ष वाढला आहे. (Ganpat Gaikwad vs Shrikant Shinde)
दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण आणि भिवंडी लोकसभेत भाजपचा उमेदवार उभा राहील आणि निवडून येईल, असे विधान केले होते. त्याला उत्तर देताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणालेले की, “जो पर्यंत असे वक्तव्य करणार नाही, तोपर्यंत प्रसिद्धी मिळणार नाही. यांचे वक्तव्य मनोरंजन म्हणून घेतलं पाहिजे”, असे टोला गायकवाड यांना लगावला होता.
भाजप आमदाराचे श्रीकांत शिंदेंना प्रत्युत्तर
आता पुन्हा आमदार गणपत गायकवाड यांनी ट्विट करत नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांना प्रत्युत्तर दिले आहेत. “ज्यांना गद्दारी करून कमी वेळात अमाप पैसा आणि सत्तेचे बळ मिळाले आहे. त्यांना त्यांच्या नजरेने सर्वजण विदूषक आहेत असा भास होतो”, असे प्रत्युत्तर आमदार गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांना दिले.
श्रीकांत शिंदे-गणपत गायकवाडांमध्ये ठिणगी कशी पडली?
चार राज्यांच्या निकालानंतर कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यावेळी आमदार गायकवाड म्हणाले होते की, “येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कल्याण आणि भिवंडी या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून येणार.” गायकवाड यांनी एका प्रकारे शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले होते.