NCP: शरद पवार कुठे चुकले? छगन भुजबळांचा दुसरा हल्ला
अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांना भाजपसोबत येण्यासाठी विनंती केली होती, असे ते म्हणाले.
ADVERTISEMENT

Maharashtra Politics : शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाने अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बंड केले. बंडानंतर आता अनेक खुलासे अजित पवार गटाकडून केले जात असून, छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर हल्ला चढवला आहे.
कायद्याचा अभ्यास करून बंड
मुंबई माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले, “वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती. जे मागच्या वर्षी घडलं, निवडणूक आयुक्त आणि त्यातून निर्माण झालेले कायदेशीर प्रश्न, सुप्रीम कोर्टाने केलेली उकल, या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकारमध्ये जायचं ठरलं, तेव्हा या सगळ्यांचा पूर्ण अभ्यास आम्ही केला.”
“वेगवेगळ्या कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून त्यानंतर निर्णय घेण्यात आले आहेत. या कायदेतज्ज्ञांनी आम्हाला सांगितलं की, या मार्गाने गेलं तर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार नाही. दोन-चार कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर जेव्हा खात्री पटली. विश्वास बसला. त्यानंतर पुढची पावलं उचलली”, असं भुजबळ यांनी सांगितलं.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार असल्याचे अध्यक्ष असल्याचे पत्र निवडणूक आयोगाला दिलं आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, “हे खरं आहे. आम्ही सरकारमध्ये सामील व्हायच्या अगोदर यासंदर्भातील कागदपत्रे, सह्या केल्या आहेत. आम्ही दाखल केलेलं आहे. अजित पवार पक्षाचे प्रमुख आहे, यापुढे राहतील.”