India Today Conclave Mumbai 2023 : शिंदे, पवार, फडणवीसांसोबत राजकीय गप्पा, ‘या’ सेलिब्रिटी लावणार हजेरी
इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह आजपासून सुरु होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून राज्यातील दिग्गज नेतेही उपस्थित राहणार आहेत. राजकारण, समाजकारण, मनोरंजन आणि विज्ञानातील वेगवेगळ्या घटना घडामोडींवर चर्चा होणार आहे.
ADVERTISEMENT

India Today Conclave Mumbai 2023: मुंबईत आजपासून इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह सुरू होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये राजकारणी, अभिनेत्यांपासून ते अर्थशास्त्र, व्यवसाय आणि विज्ञानाच्या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ व्यक्ती सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम हॉटेल ग्रँड हयात (Grand Hyatt) येथे होणार असून आज पहिल्या दिवशी या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
दिग्गज येणार एकत्र
इंडिया टुडे ग्रुपचे ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मधून नेहमीच जगभरातील उद्योजक, लेखक, अभिनेते आणि राजकारण्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमधून घडणाऱ्या घटनांवर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ आणि दिग्गज लोकांना एकत्र आणून विचारमंथन केले जाते. 2002 पासून हा मंच तयार केला असून त्याच्या माध्यमातून विविध विषयावर चर्चा केली जाते.
हे ही वाचा >>Hemant Patil : शिंदेंच्या खासदाराला स्टंटबाजी भोवली! पोलिसांनी दाखल केला अॅट्रॉसिटीचा गुन्हा
युतीचे राजकारणावर झडणार चर्चा
या कार्यक्रमात राजकारणापासून अर्थकारण, मनोरंजन आणि घडणाऱ्या अनेक घटनांवर यामध्ये चर्चा रंगणार आहे. कार्यक्रमाची सुरुवातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होार आहे. त्यामध्ये युतीचे राजकारण आणि सध्याच्या गुंतागुंतीच्या राजकारणावर चर्चा केली जाणार आहे. तर भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांच्या उपस्थितीत G-20 जागतिक घटना घडामोडींवरही चर्चा केली जाणार आहे.
महिला शास्त्रज्ञांचे विश्व
या चर्चांबरोबरच अंतराळ संशोधनात आघाडीवर असलेल्या महिला शास्त्रज्ञांवरही कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सचे संचालक डॉ. अन्नपूर्णी सुब्रमण्यम आणि आदित्य सोलर मिशनचे प्रकल्प संचालक निगार शाजी हे यामध्ये सहभागी होणार आहेत.