LPG सिलिंडरच्या किंमतीत 200 रूपयांची कपात, रक्षाबंधनची भेट की, राजकारण; नेमकं काय?
केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रक्षाबंधनपूर्वी सरकारने हा निर्णय मंगळवार (29 ऑगस्ट) घेतला आहे की, आता सर्वसामान्य ग्राहकांना गॅस सिलिंडरमागे 200 रुपये सबसिडी दिली जाईल.
ADVERTISEMENT

Reduction in price of LPG Gas cylinders : केंद्र सरकारने (Central Govt) गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रक्षाबंधनपूर्वी सरकारने हा निर्णय मंगळवार (29 ऑगस्ट) घेतला आहे की, आता सर्वसामान्य ग्राहकांना गॅस सिलिंडरमागे (LPG Gas cylinders) 200 रुपये सबसिडी दिली जाईल. तर उज्ज्वला योजनेचे सिलिंडर वापरणाऱ्या देशातील साडेनऊ कोटी गरीब महिलांचे अनुदान आता 200 रुपयांवरून 400 रुपये करण्यात येणार आहे. (LPG Cylinder Price Cut it is Raksha Bandhan Gift or Politics Whats exactly)
देशातील महिलांना रक्षाबंधनापूर्वीच मोलाची भेट
रक्षाबंधनापूर्वीच केंद्र सरकारने देशातील महिलांना लाभ दिला आहे. यामुळे महिलाही खूप खूश आहेत. अशा वेळी जेव्हा काही महिलांना गॅस सिलिंडरच्या कमी झालेल्या किंमतींबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्या म्हणाल्या की, ‘किंमती कमी झाल्या हे चांगलं आहे. जे गरीब आहेत आणि सिलिंडर भरू शकत नाहीत त्यांच्यासाठी हे चांगले होईल. सध्या हा दर 1126 इतका आहे. आता यातील 400 रूपये कमी झाले तर बरं होईल.’
Chandrayaan-3 : चांद्रयान मोहिमेत दुसरं मोठं यश,चंद्रावर आता आणखीण काय सापडलं?
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील 23 कोटी सर्वसामान्य कुटुंबांना प्रति सिलेंडर 200 रुपयांची सूट मिळणार आहे. तर 10 कोटी उज्ज्वला सिलिंडर असलेल्या महिलांना प्रति सिलिंडर 400 रुपयांची सूट मिळणार आहे.
पंतप्रधान मोदींकडून महिलांसाठी ‘ही’ खास भेट…
याबाबत पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर लिहिलं की, ‘रक्षाबंधन हा सण कुटुंबात आनंद वाढवण्याचा दिवस आहे. गॅसच्या किंमती कमी केल्याने माझ्या कुटुंबातील बहिणींच्या सोयी वाढतील आणि त्यांचे जीवन सुसह्य होईल. माझी प्रत्येक बहीण सुखी, निरोगी, आनंदी राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.’