Maharashtra SSC Result 2023 : निकालाचा टक्का का घसरला? राज्यात कोकण अव्वल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल (MSBSHSE SSC Result) शुक्रवारी (2 मे) जाहीर केला.
ADVERTISEMENT

Maharashtra SSC Result 2023 latest update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल (MSBSHSE SSC Result) शुक्रवारी (2 मे) जाहीर केला. राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात घट झाली आहे. (Maharashtra class 10 SSC Result 2023 news in marathi)
राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन दहावीच्या निकालाची घोषणा केली. यंदाच्या निकालात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 98.11 टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी 92.05 टक्के इतका लागला आहे.
मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 151 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले असून, 66 हजार विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर, 1 लाख 9 हजार 344 विद्यार्थ्यांना 85 ते 90 टक्के गुण मिळाले आहेत.
Maharashtra class SSC Result 2023 : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात घट का झाली?
यंदा दहावी परीक्षेचा राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 3.11 टक्क्यांनी घटला आहे. मार्च २०२० च्या निकालाशी तुलना केल्यास यंदाचा निकाल 1.47 टक्क्यांनी कमी लागला आहे.