Maratha Reservation : मनोज जरांगेंनी निर्णयाची केली पोलखोल, शिंदे सरकार काय करणार?
Maratha Reservation Kunbi cast certificate : मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रातील सर्व मराठा लोकांना कुणबी म्हणून जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT

Manoj Jarange Maratha Reservation Latest News : ज्यांच्याकडे कुणबी म्हणून वंशावळीच्या नोंदी असतील, त्यांना जात प्रमाणपत्र दिले जातील, असा निर्णय शिंदे सरकारने घेतला. सरकारच्या या निर्णयाकडे तोडगा म्हणून बघितले जात असतानाच मनोज जरांगे पाटलांनी निर्णयाची पोलखोल केली. जरांगे पाटलांनी सरकारला कात्रीत पकडलं असून, सरकारची डोकेदुखी वाढली आहे. सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही, तोपर्यंत उपोषण थांबवणार नाही, असा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या कुणबी जातीचे दाखले मराठा समाजाला देण्यात यावे, या मागणीचा पेच आणखी फसला आहे. कारण सरकारने ज्यांच्याकडे कुणबी म्हणून निजामकालीन नोंदी असतील, त्यांना जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. पण, या निर्णयाचा कुणालाही लाभ होणार नाही, असा दावा मनोज जरांगे पाटलांनी केला आहे.
“वंशावळी असेल, तर सरकारच्या निर्णयाची गरज नाही”
मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय की, “सरकारने घोषणा केली, पण त्या निर्णयाची प्रत अद्यापपर्यंत आलेली नाही. ज्या मराठा बांधवाकडे कुणबी असल्याच्या नोंदी असतील, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र दिले जाईल. पण, आमची मागणी अशी आहे की, मराठा समाजाला कुणबी म्हणून सरकट जात प्रमाणपत्र दिले जावेत. हीच मूळ मागणी आहे.”
हेही वाचा >> India-Bharat : 74 वर्षांपूर्वी कसं ठरलं देशाचे नाव? आंबेडकरांची भूमिका ठरली महत्त्वाची
“जर वंशावळीचे पुरावे आमच्याकडे असतील, तर आम्ही विभागीय कार्यालयात जाऊन ते प्रमाणपत्र स्वतःहून काढू शकतो. त्यासाठी अध्यादेशाची गरज नाही”, असं ते म्हणालेत. म्हणजे सरकारने निर्णय घेतला नसता, तरीही ज्यांच्याकडे वंशावळीचे पुरावे आहेत, त्या मराठा जातीतील लोकांना कुणबी म्हणून जात प्रमाणपत्र मिळू शकते.