मुंबईची खबर: आईचा छळ करणं पडलं महागात; राहतं घर सोडण्याचे मुलगा, सुनेला आदेश

मुंबई तक

मुंबईतील परळ शहरात आपल्या वृद्ध आईच्या शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पत्नीसोबत आईचं राहतं घर येत्या 60 दिवसात सोडण्याचे आदेश दिले आहेत.

ADVERTISEMENT

आईचा छळ करणं पडलं महागात; राहतं घर सोडण्याचे मुलगा, सूनेला आदेश
आईचा छळ करणं पडलं महागात; राहतं घर सोडण्याचे मुलगा, सूनेला आदेश
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आईचा छळ केल्यास न्यायाधिकरणाचे कठोर आदेश

point

आईचा छळ केल्याप्रकरणी मुलगा आणि सूनेला राहतं घर...

Mumbai News: मुलगा आणि सुनेकडून वृद्धावस्थेत असलेल्या आई-वडिलांचा छळ होत असल्याच्या घटना नेहमी पाहायला मिळतात. कधी घराच्या प्रॉपर्टीसाठी तर घरात वृद्ध आई-वडिलांची अडचण होत असल्यामुळे मुलाकडून आणि सुनेकडून त्यांना त्रास दिला जातो. मुंबईतील परळ शहरातून अशीच एक बातमी समोर आली आहे. एका वृद्ध आईचा त्याच्या मुलाकडून आणि सुनेकडून सतत छळ होत होता मात्र, पालक आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण न्यायाधिकरणाने या प्रकरणात ठोस पाऊल उचलल्याची माहिती मिळाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या वृद्ध आईच्या शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पत्नीसोबत आईचं राहतं घर येत्या 60 दिवसात सोडण्याचे आदेश दिले आहेत. मुलगा आणि त्याच्या पत्नीवर वृद्ध आईला मारहाण आणि शिवीगाळ करण्याचे आरोप आहे. 

न्यायाधिकरणाचं मत

वृद्ध महिला ही विधवा असून ती बॉम्बे पारसी पंचायत (बीपीपी) ट्रस्टची सदस्य आहे. तसेच, ती राहत असलेलं घरसुद्धा याच ट्रस्टचं आहे. त्या महिलेकडे वैयक्तिक उत्पन्नाचं कोणतंच स्त्रोत नाही. त्या वृद्ध महिलेने तसेच तिच्या मुलाकडून आणि सूनेकडून एकमेकांविरुद्ध आरोप केले आहेत. त्यामुळे न्यायाधिकरणाच्या मते, त्यांनी एकत्र राहणं योग्य ठरणार नाही. 

हे ही वाचा: Exclusive: सोनाराने अवघ्या 20 रुपयात दिला सोन्याचा दागिना, 'ते' आजी-आजोबा पाहा आता काय म्हणाले!

मुलगा आणि सूनेविरोधात आईची तक्रार

14 जानेवारी रोजी बीपीपी ट्रस्टकडून त्या मुलाला आईचं राहतं घर सोडण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र त्या जोडप्याने याकडे दुर्लक्ष केले. 27 एप्रिल 2023 रोजी त्या वृद्ध महिलेने न्यायाधिकारणात जाऊन आपला मुलगा आणि सुनेने तिचा छळ केल्याची तक्रार तिने नोंदवली. इतकेच नव्हे तर तिला शिवीगाळही केल्याचा आरोप तिने केला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp