नामशेष होत चाललेले माळढोक पक्षी अखेर सोलापुरातील अभयारण्यात दिसले
गेल्या वर्षांपासून नामशेष झालेला माळढोक पक्षी अखेर सोलापूर माळढोक अभयारण्यात परतला आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींमधून आनंद व्यक्त केला जात आहे. कधीकाळी मोठ्या संख्येने असणारे हे माळढोक पक्षी आता देशात फक्त शंभरते सव्वाशे तर राज्यात यांचा आकडा दहा सुद्धा उरला की नाही, असा प्रश्न आहे. या पक्षांच्या संवर्धनासाठी उत्तरसोलापूरचा मोठा क्षेत्र माळढोक अभयारण्यासाठी देण्यात आला आहे. मात्र […]
ADVERTISEMENT

गेल्या वर्षांपासून नामशेष झालेला माळढोक पक्षी अखेर सोलापूर माळढोक अभयारण्यात परतला आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींमधून आनंद व्यक्त केला जात आहे. कधीकाळी मोठ्या संख्येने असणारे हे माळढोक पक्षी आता देशात फक्त शंभरते सव्वाशे तर राज्यात यांचा आकडा दहा सुद्धा उरला की नाही, असा प्रश्न आहे. या पक्षांच्या संवर्धनासाठी उत्तरसोलापूरचा मोठा क्षेत्र माळढोक अभयारण्यासाठी देण्यात आला आहे. मात्र ज्या पक्षिच्या नावाने हे अभयारण्य आहे, तोपक्षीच इथे फिरकत नव्हता. त्यामुळे वन्यजीव प्रेमींमधून चिंता व्यक्त केली जात होती.
माळढोक पक्षी सोलापूरच्या अभयारण्यात दिसू लागला आहे
मागच्या काही दिवसांपासून सोलापूरच्या या अभयारण्यात हा माळढोक पक्षी दिसू लागला आहे. नामशेष होत चाललेलामाळढोक पक्षी नान्नज-गंगेवाडी अभयारण्यत मागील दोन दिवसांपासून दिसत आहे. साधारण 5 वर्षे वयाची मादीमाळढोक या अभयारण्यात आढळून आल्याने निसर्ग प्रेमींसाठी ही पर्वणी असणार आहे. मात्र वन्यजीव विभागाच्या गाईडशिवाय फिरण्यास आणि फोटो काढण्यास वनविभागाने मनाई केली आहे. वन विभागाकडून घालण्यात आलेल्यानिर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोलापुरातील अभयारण्यात ठराविक कालावधीत दिसतात माळढोक
जुलै ते ऑक्टोबर दरम्यान माळढोक पक्ष्याच्या मादीचा नियमित वावर असतो, असं वन्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्यासर्वदूर झालेल्या दमदार पावसामुळे गवत चांगले वाढले आहे.त्यावरील किडे, नाकतोडे, उंदिर खाण्यासाठी माळढोक पक्षीअभयारण्यात दरवर्षी परत येतो. त्याला पाहण्यासाठी पर्यटक माळढोक पक्षी अभयारण्यकडे धाव घेत आहेत. मात्र, त्यांनापरवानगी शिवाय फोटो काढता येणार नाही आणि गाईडशिवाय फिरता येणार नाही.