मोदींच्या दौऱ्याआधी पगडीचा वाद! ऐनवेळी तुकोबारायांच्या अभंगाच्या ओळीच बदलल्या, कारण…
पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूनला देहूमध्ये येणार आहेत. पंतप्रधान येणार म्हटल्यावर त्यांचं स्वागतही जोरदार होणार यात काहीच शंका नाही. त्यांना तुकोबारायांची पगडी दिली जाणार होती त्यावर काही ओळी होत्या. त्या ओळी ऐनवेळी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी बदलण्यात आल्या आहेत. तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हटलं जातं. त्यांच्या भले त्यासी देऊ कासेंची लंगोटी.. नाठाळाचे […]
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूनला देहूमध्ये येणार आहेत. पंतप्रधान येणार म्हटल्यावर त्यांचं स्वागतही जोरदार होणार यात काहीच शंका नाही. त्यांना तुकोबारायांची पगडी दिली जाणार होती त्यावर काही ओळी होत्या. त्या ओळी ऐनवेळी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी बदलण्यात आल्या आहेत. तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हटलं जातं. त्यांच्या भले त्यासी देऊ कासेंची लंगोटी.. नाठाळाचे माथी हाणू काठी… या होत्या. मात्र या ओळी बदलल्या गेल्या आहेत.
काय होतो भले त्यासी देऊ कासेंची लंगोटी.. नाठाळाचे माथी हाणू काठी… ओळींचा अर्थ नेमका काय ?
जो आमच्याशी चांगला वागेल त्याच्यासाठी आम्ही खूपच चांगले आहोत, आमच्याशी प्रेमाने वागणाऱ्या माणसाला आम्ही कोणतीही मदत करण्यासाठी सदैव तयार असतो. एखाद्याला मदत करायचे ठरवले तर आम्ही लंगोटी काढून सुद्धा देऊन मात्र आमच्या चांगुलपणाचा कोणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्याला काठीचे फटके द्यायला देखील आम्ही मागेपुढे बघत नाही. हा या ओळींचा अर्थ होतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी देहूला येतील. त्यावेळी त्यांना जी पगडी देण्यात येणार आहे त्यावरच्या ओळी आता बदलण्यात आल्या आहेत. या विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ या ओळी आता या पगडीवर असणार आहेत.