पुणे मेट्रो: एकासोबत लिव्ह-इन रिलेशन, दुसऱ्यासोबत लग्न आणि फिस्कटलेला बिअर बिझनेस.. पुण्यातील न ऐकलेली क्राईम स्टोरी

ओमकार वाबळे

एका तरुणीचे एकासोबत लिव्ह-इन रिलेशन, त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न आणि या सगळ्यात तिचा एक्स-बॉयफ्रेंड. दोघांमध्ये झालेला 18 लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार कसा महागात पडला? आणि त्यांचा फिस्कटलेला 'बिअर बिझनेस' या मागे नक्की काय रहस्य होते? जाणून घ्या गुन्ह्याची थरारक आणि सत्य माहिती.

ADVERTISEMENT

pune metro omkar wable a live in relationship with one marriage to another and a failed beer business an untold crime story from pune
Pune Crime
google news

पुणे: सुरुवातीला स्टोरी थोडी किचकट वाटेल, पण एकदा मी ही एफआयआर वाचायला सुरुवात केली की तुमच्या डोक्यामध्ये नाव, घटनाक्रम आणि प्रसंग या तिन्ही गोष्टी एकदम क्रिस्टल क्लिअर होतील. थेट गोष्टीला सुरुवात करू.

पुण्यातील न ऐकलेली थरारक कहाणी

त्याचं कारण असं आहे की जळगावहून पुण्यामध्ये राहायला आलेली एक महिला प्रेमात पडते. त्यानंतर ती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागते. नंतर त्या दोघांचं ब्रेकअप होतं. त्यानंतर ती आणखी एका व्यक्तीशी लग्न करते. त्याच्यासोबत घटस्फोट होतो आणि मग आधीचा जो बॉयफ्रेंड असतो, लिव्ह-इनमधला, ते दोघं पुन्हा एकदा संपर्कात येतात.

तिथून एकदा परत पूर्वी तुटलेल्या नात्याला सुरुवात केल्यानंतर अशा एक-एक ड्रामॅटिक गोष्टी घडतात की अगदी बिअरच्या बिझनेसपासून ते लोनपर्यंत प्रकरण जातं आणि शेवटी 18 लाखांचा चुना लागतो.

पुण्यातल्या एका चांगल्या एरियामध्ये घडलेलं हे सगळं प्रकरण. ज्यावेळी मी एफआयआर वाचायला घेतली, त्यावेळी डोक्यात मुंग्या आल्या. कारण नातेसंबंधांमध्ये झालेले बदल आणि एक-एक गोष्ट जशी पुढे जाते, आयुष्यामध्ये तशी किती फ्लक्चुएशन्स असतात, इमोशन्स असतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एफआयआरमधून क्लिअर होतील.

हे वाचलं का?