रात्रंदिवस काम केलं, कष्ट उपसले.. पण शिक्षण नाही सोडलं, 10वीच्या परीक्षेत 35 टक्के मिळवले!
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (17 जून) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन जाहीर झाला. यावेळी राज्याचा निकाल 96.94 टक्के इतका लागला आहे. यावेळी पुण्यातील भवानी पेठेत राहणारा आणि रमणबाग शाळेतील शुभम राहुल जाधव या विद्यार्थ्याला इयत्ता दहावीमध्ये सर्व विषयामध्ये 35 गुण मिळाले आहे. […]
ADVERTISEMENT

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (17 जून) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन जाहीर झाला. यावेळी राज्याचा निकाल 96.94 टक्के इतका लागला आहे. यावेळी पुण्यातील भवानी पेठेत राहणारा आणि रमणबाग शाळेतील शुभम राहुल जाधव या विद्यार्थ्याला इयत्ता दहावीमध्ये सर्व विषयामध्ये 35 गुण मिळाले आहे.
तसेच त्याच्या सर्व गुणांची टक्केवारी 35 टक्के इतकी झाली आहे. त्यामुळे आता त्याचे मार्क सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दरम्यान, शुभमच्या परिसरातील नागरिकांनी पुणेरी पगडी आणि पेढे देऊन अभिनंदन केलं आहे.
आता मला पोलीस व्हायचंय: शुभम जाधव
‘माझ्या घरची परिस्थिती हलाखीची असून वडील पाण्याच्या टाक्या दुरुस्तीच करतात. तर आई धुणीभांडी करण्याचं काम करते. माझ्या दहावीच्या शिक्षणाचा खर्च आई वडिलांवर नको म्हणून, मी हार्डवेअरच्या दुकानात काम करायचो.’ असं म्हणत शुभम जाधवने आपली घरची परिस्थिती बेताची असतानाही शिक्षण घेत असल्याची माहिती दिली.