सुप्रिया सुळेंचा पारा चढला, ‘ते’ सोलापुरातील संतापजनक प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

solapur college student beaten 2 girls communal tension accused ncp supriya sule police
solapur college student beaten 2 girls communal tension accused ncp supriya sule police
social share
google news

सोलापूर: सोलापुरातील काही संघटना तरुणांची माथी भडकवून त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीकडे घेऊन जात असल्याचं सध्या बोललं जात आहे. जातीय तेढ निर्माण करून सोलापुरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आरोपही आता केले जात आहेत. शहरातील एका महाविद्यालयात एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेत असलेल्या एका तरुणास बुधवारी 7 जून रोजी दुपारी जबर मारहाण करण्यात आली आहे. तू आमच्या धर्माच्या तरुणींना फसवतो का? असा जाब विचारत संबंधित तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. याबाबत पीडित तरुणाने जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (solapur college student beaten 2 girls communal tension accused ncp supriya sule police)

पीडित तरुणाने लव जिहादचा देखील फिर्यादमध्ये उल्लेख केला आहे. पोलिसांनी पीडित तरुणाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पीडित तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून 10 ते 15 जणांविरोधात भा.द वि.363, 324, 341, 143, 147, 149, 504, व 506 प्रमाणे जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जेलरोड पोलिसांनी एका संशयितास अटक करून कोर्टासमोर हजर केले आहे.

‘आमच्या धर्माच्या मुलीला फसवतो का?’ सोलापुरातील तरुणाला मारहाण

सोलापूर शहरातील एका नामांकित महाविद्यालयात एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याकडे काही तरूणी आल्या होत्या. ते लोकं नोकरीनिमित्त बोलत बसले होते. काही काही वेळाने दुसऱ्या अन्य एका समाजाचे तरुण तिथे आले. ‘तू आमच्या धर्मातील मुलींसोबत का बोलतो?’ असा जाब विचारू लागले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काही समजण्याआधीच टोळक्यातील तरुणांनी पीडित तरुणास एमआयडीसी परिसरात घेऊन गेले व जबर मारहाण करू लागले. त्याच्या डोक्यावर व पाठीवर मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी पावणे तीन ते चार दरम्यान घडली. जखमी अवस्थेत असताना पीडित तरुणाने मारहाण करणाऱ्याचे मोबाइल नंबर घेतले होते. बुधवारी रात्री जखमी झालेल्या तरुणाने जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित तरुणाने फिर्याद देताना महत्वाची बाब नमूद केले असून लव जिहादचा देखील उल्लेख केला आहे.

एका संशयितास अटक

शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी या घटनेवरून त्वरित कारवाई करण्याचे आदेश जेलरोड पोलिसांना दिले होते. शहर पोलिसांनी ताबडतोब तपास करत बुधवारी मध्य रात्री व गुरुवारी पहाटेच्या सुमारास एका संशयितास अटक करून त्याला कोर्टात हजर केले आहे. इतर 10 ते 15 जणांचा तपास सुरू आहे. अटक केलेल्या संशयित आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर झाली आहे. याबाबत विजय कबाडे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे कोणी षडयंत्र करत असेल तर सोलापूर पोलीस त्यांवर कठोर कारवाई करेल. सोशल मीडियावर सोलापूर सायबर पोलीस नजर ठेवून आहे.

ADVERTISEMENT

याच प्रकरणावरुन सुप्रिया सुळेही संतापल्या

‘मी आजच एक बातमी पाहिली… एक मुलगा सोलापूरमध्ये दोन मुलींसोबत कॉफी पित होता. तिथे त्याचे प्रोफेसरही होते. कॉफी पित असताना काही मुलं तिथे आली आणि त्यांनी त्या मुलाला भयंकर मारलं. ही कुठली दडपशाही आहे, गुंडाराज आहे. जर सोलापूर सारख्या ठिकाणी मुलीसोबत साधी कॉफी पिऊ शकत नसेल तर हे पूर्णपणे प्रशासनाचं अपयश आहे.’

ADVERTISEMENT

‘म्हणजे तुम्ही एखाद्या मुलाला काय म्हणून मारलं.. मी वाचलं की पोलिसांनी कारवाई केली. पण हिंमतच कशी होते अशी एखाद्या मुलाला मारायला. ही कुठली संस्कृती आहे.’ असं म्हणत सुप्रिया सुळेंनी देखील आपला संताप व्यक्त केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT