LPG Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या दरात कपात, महाराष्ट्रात नवे दर किती?
LPG Gas Cylinder Price : गॅस कंपन्यांनी आज सोमवारपासून 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 30 रुपयांनी कमी केल्या आहेत. यामुळे आता नवीन दरानुसार दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर आता 1,646 रुपयांना मिळणार आहे. याआधी तो 1,676 रुपयांना मिळत होता.
ADVERTISEMENT
19 kg Lpg cylinder prices drop In Maharashtra : गॅस सिलिंडरचे आजपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत. या नवीन दरानुसार आता व्यावसायिक गॅस सिलिंडर( commercial ga)s 30 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज 1 जुलैपासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये कपात करण्यात आली आहे, मात्र घरगुती गॅसच्या (Domestic gas) दरात कोणत्याही प्रकारची कपात करण्यात आली नाही आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. (19 kg LPG Cylinder Prices Drop by Rs 30 commercial gas rates down what about domestic gas latest lpg gas price in marathi)
ADVERTISEMENT
गॅस कंपन्यांनी आज सोमवारपासून 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 30 रुपयांनी कमी केल्या आहेत. यामुळे आता नवीन दरानुसार दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर आता 1,646 रुपयांना मिळणार आहे. याआधी तो 1,676 रुपयांना मिळत होता.
हे ही वाचा : Vidhan Parishad Election : पंकजा मुंडेंसह 10 भाजपचे दहा नेते शर्यतीत, मविआ कुणाला देणार संधी?
मुंबईत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1,598 रुपये झाली आहे. याआधी तोच सिलेंडर 1629 रूपये मिळत होता. कोलकत्त्यात व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1,756 रुपये झाली आहे. याआधी तोच सिलेंडर 1778 रुपयांना मिळायचा. तसेच चेन्नईच आता 1,809.50 रुपयांना सिलेंडर मिळणार आहे.
हे वाचलं का?
विशेष म्हणजे घरगुती वापरात असलेल्या 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती स्वयंपाकाचे सिलिंडर दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, चेन्नईमध्ये 818.50 रुपये आणि मुंबईत 802.50 रुपयांना किरकोळ विक्री होत आहेत.
हे ही वाचा : Vidhan Sabha election : जानकरांनी महायुतीची वाढवली चिंता, भाजप कसा काढणार तोडगा?
दरम्यान आजपासून हे नवीन दर लागू करण्यात आले होते. या नवीन दरानुसार छोट्या मोठ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र घरगुती गॅस धारकांना कुठल्याही प्रकारची सवलत मिळाली नाही आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संताप आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT