21 December 2024 Gold Rate: अहो राव! काय मस्त आहे सोन्याचा भाव; मुंबईसह 'या' शहरांमध्ये सोन्याचे भाव घसरले

मुंबई तक

Today Gold Rate In India: सोन्याच्या दरात आज पुन्हा शनिवारी 21 डिसेंबरला घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोनं सलग चौथ्या दिवशी स्वस्त झालं आहे.

ADVERTISEMENT

गोल्ड सिल्व्हर रेट (प्रतिनिधी प्रतिमा).
गोल्ड सिल्व्हर रेट (प्रतिनिधी प्रतिमा).
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सलग चौथ्या दिवशी सोनं झालं स्वस्त!

point

सोन्या-चांदीचे भाव किती रुपयांनी गडगडले?

point

मुंबईत 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate In India: सोन्याच्या दरात आज पुन्हा शनिवारी 21 डिसेंबरला घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोनं सलग चौथ्या दिवशी स्वस्त झालं आहे. जर तुम्हाला लग्नसराईच्या हंगामात सोनं खरेदी करायचं असेल, तर आज सोनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे. एक्सपर्टच्या माहितीनुसार, पुढील दिवसांत सोन्या-चांदीचे भाव वाढणार आहेत. आज 21 डिसेंबरला 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 350 रुपयांची घट झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर 350 रुपये आणि 22 कॅरेटच्या सोन्याचे भाव जवळपास 350 रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहेत. मागील आठवड्यापासून सोन्याच्या भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 76000 रुपयांच्या पुढे आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 70 हजारांपार आहेत. चांदीच्या एक किलोग्रॅमच्या दरात दोन हजार रुपयांनी घट झाली आहे. एक किलो चांदीचे भाव 90,500 रुपये आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

दिल्ली 

दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76950 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 70550 रुपये आहेत.

मुंबई 

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76880 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 70400 रुपये आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp