Parbhani: सेप्टिक टँकमध्ये उतरले अन् मृतदेहच मिळाले, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Parbhani News Marathi : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मारूती राठोड यांच्या शेतात ही घटना घडली.
ADVERTISEMENT
पाच कामगारांच्या मृत्यूने परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सेप्टिक टँकची स्वच्छता करण्यासाठी आतमध्ये उतरल्यानंतर मजूरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गुरूवारी (11 मे) रात्री ही दुर्दैवी घटना घडली आहे. यात एका कामगारांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शिवारात मारूती राठोड यांची शेती आहे. राठोड यांनी त्यांच्या शेतात सेप्टिक टँक तयार केलेली आहे. ही सेप्टिक टँक स्वच्छ करण्यासाठी त्यांनी कामगारांना बोलावलं होतं.
हेही वाचा >> Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा नेमका अर्थ काय?
कामगार स्वच्छता करण्यासाठी सेप्टिक टँकमध्ये उतरले. मात्र ते बाहेर आलेच नाही. पाचही कामगारांचा गुदरमरून मृत्यू झाला. अंधार असल्यामुळे हा प्रकार लवकर कळला नाही, अशी माहिती समोर आली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मृत्यू झालेल्या कामगारांपैकी चार जणांचं वय 30 वर्षापेक्षा कमी आहे. शेख सादेक (वय 45), शेख शाहरुख (वय 20), शेख जुनेद (वय 29), शेख नाविद (वय 25), शेख फिरोज (वय 25) अशी मृतांची नावं आहेत. या घटनेमध्ये शेख साबेर या कामगारांची प्रकृती गंभीर असून, त्याच्या उपचार सुरू आहे.
हेही वाचा >> उद्धव ठाकरेंचा राजीनामा, सुप्रीम कोर्टाचा निकाल; शरद पवारांचं विश्लेषण काय?
पाच कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. पाच जणांचे मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT