अहमदनगर : तीन महिन्यांच्या बाळाला आई-वडिलांनी गळा दाबून संपवलं, मृतदेह मुळा नदीपात्रातील झुडपात फेकला
Ahmednagar Crime : तिघांनी मिळून बाळाचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात नेऊन टाकून दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अहमदनगर : तीन महिन्यांच्या दिव्यांग बाळाला आई-वडिलांनी गळा दाबून संपवलं
मृतदेह मुळा नदीपात्रातील झुडपात फेकला
Ahmednagar Crime : अहिल्यानगर जिल्ह्यात मानवी संवेदनांना हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. तीन महिन्यांच्या दिव्यांग बालकाचा स्वतःच्या आई-वडिलांनीच गळा दाबून खून केला आणि मृतदेह दूरवर नेऊन टाकून दिल्याचा प्रकार प्रकाशात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आई-वडिलांसह तिसऱ्या व्यक्तीला अटक केली असून घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
संगमनेर तालुक्यातील आंबील खालासा येथील रहिवासी अशोक धोंडीराम माळी यांना 4 डिसेंबर रोजी सकाळी मुळा नदीच्या पात्रातील झुडपांमध्ये एका अर्भकाचा मृतदेह आढळला. काही दिवसांपूर्वीच मृतदेह कुजत असल्याने ओळख पटविणे कठीण झाले होते. माहिती मिळताच संगमनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पाळेमुळे खोदून काढण्यात आलेला हा मृतदेह दोन ते तीन महिन्यांच्या बालकाचा असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तपासाला वेग आला.
घटनास्थळी मिळालेल्या प्राथमिक पुराव्यांवरून पोलिसांनी विविध दिशांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फूटेज, मोबाईल लोकेशन तसेच स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीद्वारे पोलिसांना संशय एका दाम्पत्यावर गेला. पुढील तपासात उघड झालं की, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शिवपूर, आव्हाणा येथील प्रकाश पंडित जाधव (वय 37) आणि त्यांची पत्नी सविता (वय 32) यांनी जन्मलेल्या दिव्यांग बालकाचा खून केला होता.
हेही वाचा : लग्नानंतर हुंड्याची मागणी, शारीरिक छळ, पतीचे अनैतिक संबंध अन्... महिला पोलीस कॉन्स्टेबलचे पतीवर गंभीर आरोप










