Sushma Andhare : उद्धव ठाकरेंकडून 2 नेत्यांची हकालपट्टी, अंधारे म्हणाल्या…
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बीडचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव पाटील आणि जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली. दरम्यान, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी बीडमध्ये झालेल्या घटनेनंतर भूमिका मांडली.
ADVERTISEMENT
Sushma Andhare Video : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारेंना मारहाण झाल्याच्या एका घटनेनं खळबळ उडाली आहे. बीडमध्ये ठाकरे गटातील अंतर्गत कलह शिगेला जाऊन वाद झाला. शनिवारी महाप्रबोधन यात्रेची सभा होत असून, त्यापूर्वीच हा वाद भडकला. या प्रकरणात आता उद्धव ठाकरेंनी बीड जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुखांची हकालपट्टी केली आहे. दरम्यान, पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंना चापट मारल्याचा दावा केला. त्यावर अंधारेंनी झालेली घटना सांगत बाजू मांडली आहे.
ADVERTISEMENT
बीडमध्ये ठाकरे गटात गुरुवारी (18 मे) वाद झाला. या वादानंतर बडतर्फ करण्यात आलेले जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी दावा केला की, “मी सुषमा अंधारेंना दोन चापटा मारल्या.” या घटनेनंतर उद्धव ठाकरेंनी आप्पासाहेब जाधव यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांचीही तडकाफडकी हकालपट्टी केली.
हेही वाचा >> ‘सुषमा अंधारेंना दोन चापटा लगावल्या’, ठाकरे गटात वादाची ठिणगी; काय घडलं?
आप्पासाहेब जाधव, धोंडू पाटील यांची हकालपट्टी
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव खासदार विनायक राऊत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दोघांची हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती दिली. ‘बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील व जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे”, अशी माहिती राऊत यांनी दिली.
हे वाचलं का?
सुषमा अंधारेंनी फेसबुक लाईव्ह करत मांडली बाजू
“आमच्याच पक्षातील जिल्हाप्रमुख अर्थात अस्तीनीतील साप अप्पा जाधव याने काहीतरी लाईव्ह येऊन व्हिडिओ जाहीर केला आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एक संभ्रम तयार करण्यासाठी आणि महाप्रबोधन यात्रेची 20 मे रोजी ग्रामीण महाराष्ट्रातील समारोपीय सभेला गालबोट लावण्यासाठी हा सगळा बनाव केला.”
हेही वाचा >> Video : अंगावर धावले..,खुर्च्यांची फेकाफेक…, ग्रामसभेत दोन गटात तुफान राडा
“यात किती तथ्य आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी आपल्यासमोर जिल्हाप्रमुख अनिल जगताप, लोकसभा संपर्कप्रमुख धांडे, तद्वतच उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव कुलकर्णी, तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे, तालुकाप्रमुख व्यंकट शिंदे, सह संपर्कप्रमुख बाळासाहेब अंभोरे, शहर प्रमुख राजेश विभुते नितीन धांडे, जिल्हा संघटक नितीन धांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जगताप असे अनेक मंडळी आप्पासाहेब जाधव हा काय प्रकार आहे. यावर बोलत आहेत कृपया माध्यमांनी नोंद घ्यावी”, असे अंधारेंनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
“माने कॉम्पलेक्स महाप्रबोधन यात्रेची सभा होतेय. सगळे पदाधिकारी मैदानावर होतो. मैदानाची पाहणी केली. फेसबुक लाईव्हसाठी मी गाडीत बसले. त्याचवेळी आप्पासाहेब जाधव हे एका माणसाला सूचना देत होते. काम सांगत होते. त्यांची भाषा उर्मटपणाची, एकेरीची होती. ती भाषा समोरच्या माणसाला सहन झाली नाही. तो म्हणाला तू नीट बोल. मी काही कामगार नाही. त्याला माहिती नव्हतं की, ते जिल्हाप्रमुख आहेत.”
ADVERTISEMENT
हेही वाचा >> DK Shivkumar : डीके शिवकुमार ED, CBI आणि IT च्या जाळ्यात कसे अडकले? काय आहेत आरोप?
“त्यावर आप्पासाहेब जाधव म्हणाले की, मी जिल्हाप्रमुख आहे, तू नीट बोललं पाहिजे, असं म्हणत त्यांनी शिवी दिली. शिवी दिल्यामुळे भांडण सुरू झालं. या भांडणात उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर मध्ये पडले. काय घडतंय म्हणून मी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, आमदार अनिल धांडे तिथे गेलो. तोपर्यंत जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव गाडी घेऊन पळून गेले होते.”
“आम्ही माहिती घेतली असताना गणेश वरेकर म्हणाले की, माझा मित्र अनुसूचित जातीतील आहे. त्याने (आप्पासाहेब जाधव) जातीवाचक शिव्या दिल्या आहेत. पोलीस ठाण्यात तक्रार द्यायची आहे. सभा शांततेत पार पाडायची म्हणून काहीही करू नये असं ठरलं. पण ज्यांना आमच्या सभेत अडथळा आणायचा आहे, त्यांनी खेळी केली आणि आप्पा जाधव यांनी एक व्हिडीओ टाकला. त्यामुळे अनेकांना असं वाटलं की खरंच काही घडलं का?”, असं सांगत सुषमा अंधारेंनी फेसबुक लाईव्हवरून भूमिका मांडली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT