Cyclone: बिपरजॉय घेऊन आलंय मोठं संकट, चक्रीवादळाने केलाय कहर!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Biperjoy has brought a big crisis, the cyclone has wreaked havoc gujarat mumbai!
Biperjoy has brought a big crisis, the cyclone has wreaked havoc gujarat mumbai!
social share
google news

Biparjoy Cyclone: मुंबई: बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) गुजरातमध्ये (Gujarat) पोहोचलं असून वाऱ्याचा वेग हा ताशी 150 किलोमीटरच्या आसपास आहे. एवढ्या जोराच्या वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. उदाहरणादाखल आपण समजून घेऊया की, 150 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारी कार जर कुठे आदळली तर सहसा आत बसलेली व्यक्ती वाचत नाही. त्यामुळे जेव्हा वारा या वेगाने सतत येत राहिल तेव्हा तेथील भागाची नेमकी काय परिस्थिती होईल याची थोडीशी कल्पना करा. (biparjoy cyclone big crisis strength winds speed 100-150 km biperjoy became a big threat

ADVERTISEMENT

वाऱ्याच्या वेगाने कळते वादळाची ताकद

भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, चक्रीवादळामुळे वारे ताशी 31 किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी वेगाने वाहू लागले तर त्याला कमी दाबाचे चक्रीवादळ (Low Pressure Cyclone) म्हणतात. जेव्हा वारा ताशी 31 ते 49 किलोमीटर वेगाने वाहतो तेव्हा त्याला डिप्रेशन, 49 ते 61 वेगाने वारा वाहू लागला तर डीप डिप्रेशन, 61 ते 88 वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याला सायक्लोनिक स्टॉर्म म्हणजेच चक्रीवादळ म्हणतात. तर 88 ते 117 वेगाने वाहणाऱ्या वादळाला तीव्र चक्रीवादळ आणि 121 किमी प्रतिप्रतितास वेगाने सुपर चक्रीवादळ म्हणतात. म्हणजे Biperjoy यावेळी सुपर सायक्लोन म्हणून गुजरात जवळ धडकत आहे.

हे वाचलं का?

वेगानुसार ठरवली जाते श्रेणी

NDM नुसार, चक्रीवादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग ताशी 120 ते 150 किलोमीटर वेगाने वाहत असेल, तर त्याला 01 श्रेणीचे चक्रीवादळ म्हणतात. या वेगात कमी नुकसान होते. 02 श्रेणी म्हणजे 150 ते 180 वेगाने मध्यम नुकसान, 03 श्रेणी म्हणजे 180 ते 210 वेगाने जास्त नुकसान, 04 म्हणजे 210 ते 250 वेगाने गंभीर नुकसान आणि पाचवी श्रेणी 250 किमी प्रतिप्रतितास किंवा त्याहून अधिक वेगाने वादळ तयार होते. जे भयंकर नुकसान करतं.

हे ही वाचा >> मनोज सानेला होती सेक्सची चटक, म्हणून सरस्वतीला… फोनमध्ये सापडले पॉर्न Video

आता जाणून घ्या वाऱ्याच्या वेगाने काय होते

  • 2 किमी/प्रतितास: याला शांत वारा म्हणतात. यामध्ये हवा सरळ वर येते.
  • 2-5 किमी/प्रतितास: हलका वारा म्हणजेच हवा किंचित डोलत वरच्या दिशेने वर जाते.
  • 6-11 किमी/प्रतितास: चेहऱ्यावर हवा जाणवू लागते. पाने आणि हलक्या फांद्या हलू लागतात.
  • 12-19 किमी/प्रतितास: ध्वज हलवण्यास सुरुवात होते. झाडांची पाने तुटू लागतात.
  • 20-29 किमी/प्रतितास: धूळ आणि कागदासारख्या गोष्टी वाऱ्याबरोबर उडू लागतात.
  • 30-39 किमी/प्रतितास: लहान झाडे डोलतात. तलाव आणि नद्यांमध्ये लाटा उसळू लागतात.
  • 40-50 किमी/प्रतितास: झाडांच्या जाड फांद्या हलतात. विजेच्या तारा एकमेकांवर आपटायला लागतात. छत्री हाताळणे कठीण होतं.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> चित्रा वाघ सप्रिया सुळेंवर चांगल्याच भडकल्या! ‘मोठ्या ताई’ म्हणत दिलं प्रत्युत्तर

  • 51-61 किमी/प्रतितास: संपूर्ण झाड हलू लागते. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने चालणे कठीण होते.
  • 62-74 किमी/प्रतितास: झाडांच्या फांद्या तुटू लागतात. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने चालणे फार कठीण होऊन बसते.
  • 75-87 किमी/प्रतितास: इमारतींना हलके नुकसान होऊ शकते. खिडक्या तुटू शकतात. घरावरील छप्परं उडू शकतात.
  • 88-101 किमी/प्रतितास: झाडे उन्मळून पडू लागतात. विजेचे खांब व तारा तुटण्यास सुरुवात होते.
  • 102-116 किमी/प्रतितास: या वेगाने वारा खूप नुकसान करू लागतो. पार्क केलेल्या गाड्या सरकायला लागतात. समुद्रातील लाटा वेगाने उसळतात.
  • 117 किमी/प्रतितास पेक्षा जास्त: या वेगानंतर वारा कहर निर्माण करतो. नद्या, तलाव आणि समुद्रात उंच लाटा उसळतात. पुराचा धोका निर्माण होतो. खिडक्या आणि दरवाजे तुटतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT