Nashik Accident : सप्तश्रृंगी गडावर कठडा तोडून प्रवासी बस कोसळली घाटात, पहा Video

मुंबई तक

ADVERTISEMENT

An ST bus crashed at Saptashringi ghat in Nashik district. A woman died in this. 18 passengers were injured.
An ST bus crashed at Saptashringi ghat in Nashik district. A woman died in this. 18 passengers were injured.
social share
google news

Nashik Bus Accident : मुंबई-नागपूर महामार्गावरील खासगी बसला अपघात झाल्याच्या घटनेला आठवडात होत नाही, तोच नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गडावर एक भयंकर अपघात घडला आहे. प्रवाशांना घेऊन निघालेली बस रस्त्याचा कठडा तोडून घाटात कोसळली. वणी घाटात 400 फूट खोल खाली ही बस गेली. यात 1 प्रवाशाचा मृत्यू झाला असून, 22 जण जखमी झाले आहेत. बस घाटात कोसळल्यानंतरचा व्हिडीओही समोर आला आहे.

ADVERTISEMENT

सप्तश्रृंगी गड घाट म्हणजेच वणीच्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सप्तशृंगी गड ते खामगाव ही बुलढाणा आगाराची एसटी बस थेट दरीत कोसळली. या बसमध्ये 23 (चालक आणि वाहकासह) प्रवासी होते अशी माहिती देण्यात आली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मंगळवारी (12 जुलै) सकाळी 6:45 वाजता मुक्कामी बस (Mh 40 AQ 6259) सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेने निघाली होती. काही किलोमीटर अंतरावरच असलेल्या घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली.

हे वाचलं का?

वाचा >> Pawar Family: अजितदादांच्या बंडानंतर पक्ष, पवार कुटुंबात फूट पण ‘इथे’ मात्र सगळे एकत्र!

घटनेची माहिती मिळताच सप्तशृंगी देवी ट्रस्ट, पोलीस प्रशासन, ग्रामस्थ, आपत्ती व्यवसथापन घटनास्थळी दाखल झाले आणि घाटातून जखमींना झोळी करून बाहेर काढण्यात आले. जखमींना वणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

saptashrungi gad vani : ST bus fell into the valley in Saptsringi Gad Ghat in nashik.
सप्तश्रृंगी गड घाट म्हणजेच वणीच्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली.

 

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार बसमध्ये चालक आणि वाहकासह एकूण 23 प्रवासी होते. यात 1 प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी 8 जणांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर 14 जखमी प्रवाशांना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमध्ये 16 प्रवासी हे अमळनेर तालुक्यातील मुळी या गावचे आहेत. तर 4 प्रवासी हे गडावरील होते.

ADVERTISEMENT

वाचा >> ‘तुम्ही 50 ठिकाणी माफी मागणार आहात का?’, छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल

बसचा अपघात का झाला?

अपघात झालेल्या गणपती टप्प्यावर वळण आहे. पावसाळी वातावरणामुळे सकाळी गडावर धुके असल्याने चालकाला अंदाज आला नसावा, अशी शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. चालक जखमी असल्याने अजून त्याचा जबाब घेतला गेला नाहीये. बस कठडा तोंडून घाटात कोसळली. बस दरीत जात असताना मध्येच मोठे झाड लागले. त्यामुळे बस थांबली आणि मोठी दुर्दैवी घटना टळली. बस खाली गेली असती, तर मृतांचा आकडा वाढला असता असं सांगितलं गेलं.

सप्तशृंगी गड अपघात मृत व जखमींची नावे

मयत महिला -आशा राजेंद्र पाटील (वय 50 ते 55 वर्ष दरम्यान) मुळी गाव, अंमळनेर, जि. जळगाव

जखमी

1) गजानन पांडुरंग टपके (वय 39, अकोला)
2) प्रमिळाबाई गुलाबराव बडगुजर (65, मुळी, अंमळनेर, जि. जळगाव)
3) रघुनाथ बळीराम पाटील (वय 70, भोकर, ता.जि, जळगाव)
4) बाळू भावलाल पाटील (वय 48, भोकर, ता.जि, जळगाव)
5) लक्ष्मी काळू गव्हाणे (वय 40, सप्तशृंगी गड, ता.कळवण, जि. नाशिक)
6) संजय बळीराम भोईर (वय 60, भोकर, ता.जि. जळगाव)
7) सुशीलबाई सोनू बडगुजर (वय 20, मोडिमांडल, जि. जळगाव)
8) वच्छलाबाई साहेबराव पाटील (वय 65, भोकर, ता.जि. जळगाव)
9) सुशिलाबाई बाबन नजान (वय 65, भोकर, ता.जि. जळगाव)
10) भुत्याबाई वामन सूर्यवंशी (वय 75, निफाड, जि. नाशिक)
11) यमुना रामदास गांगुर्डे (वय 40, सप्तशृंगी गड, ता. कळवण, जि. नाशिक)
12) विमलबाई भोई (वय 59, मुळी, अंमळनेर, जि. जळगाव)
13) प्रतीक्षा संजय भोई (वय 45, मुळी, अंमळनेर, जि. जळगाव)
14) जिजाबाई साहेबराव पाटील (वय 65, मुळी, अंमळनेर, जि. जळगाव)
15) ज्योती उमेश पाटील (खडक शिरपूर, ता.शिरपूर, जि धुळे)
16) संगीता मंगुलाल भोई (वय 56, मुळी, अंमळनेर, जि. जळगाव)
17) रत्नाबाई
18) मुन्शी दगडू खारके (वय 68, ता. साक्री, जि. धुळे)
19)सुरेखाबाई हिरालाल बडगुजर (वय 43, मुळी, अमळनेर, जि. जळगाव)
20) ज्योती उमेश पाटील (वय 29, खडक शिरपूर, ता.शिरपूर, जि. धुळे)
21) संगीता बाबूलाल भोई (वय 60, मुळी, अमळनेर, जि. जळगाव)
22) भारयोबाई माधवराव पाटील (वय 52, मुळी, अंमळनेर, जि. जळगाव)

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT