NCP: शरद पवार कुठे चुकले? छगन भुजबळांचा दुसरा हल्ला
अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांना भाजपसोबत येण्यासाठी विनंती केली होती, असे ते म्हणाले.
ADVERTISEMENT
Maharashtra Politics : शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाने अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बंड केले. बंडानंतर आता अनेक खुलासे अजित पवार गटाकडून केले जात असून, छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर हल्ला चढवला आहे.
ADVERTISEMENT
कायद्याचा अभ्यास करून बंड
मुंबई माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले, “वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती. जे मागच्या वर्षी घडलं, निवडणूक आयुक्त आणि त्यातून निर्माण झालेले कायदेशीर प्रश्न, सुप्रीम कोर्टाने केलेली उकल, या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकारमध्ये जायचं ठरलं, तेव्हा या सगळ्यांचा पूर्ण अभ्यास आम्ही केला.”
“वेगवेगळ्या कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून त्यानंतर निर्णय घेण्यात आले आहेत. या कायदेतज्ज्ञांनी आम्हाला सांगितलं की, या मार्गाने गेलं तर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार नाही. दोन-चार कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर जेव्हा खात्री पटली. विश्वास बसला. त्यानंतर पुढची पावलं उचलली”, असं भुजबळ यांनी सांगितलं.
हे वाचलं का?
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार असल्याचे अध्यक्ष असल्याचे पत्र निवडणूक आयोगाला दिलं आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, “हे खरं आहे. आम्ही सरकारमध्ये सामील व्हायच्या अगोदर यासंदर्भातील कागदपत्रे, सह्या केल्या आहेत. आम्ही दाखल केलेलं आहे. अजित पवार पक्षाचे प्रमुख आहे, यापुढे राहतील.”
“पक्षाची घटना, प्रचलित राजकीय पक्षासंदर्भातील निवडणूक आयुक्तांकडे असलेले नियम या सगळ्या गोष्टीची चर्चा करून त्याची मांडणी अगोदरच केलेली आहे”, असंही भुजबळांनी यावेळी सांगितलं.
ADVERTISEMENT
वाचा >> शिवसेनेचे दोन आमदार भिडले, दौरा अर्ध्यावर सोडून एकनाथ शिंदे मुंबईत
शरद पवारांचं वय 83 आहे आणि त्यांनी निवृत्त व्हायला हवं, असा थेट हल्ला अजित पवार यांनी केला होता. त्यावरून भुजबळ यांना तुमचंही वय 75 पेक्षा अधिक असून, ही निवडणूक तुमची शेवटची असेल का? त्यावर भुजबळ म्हणाले, “म्हणून मी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलेलं नाही. 1999 मध्ये मला प्रदेशाध्यक्ष केलं होतं. मी चार महिने राहिलो होतो. आता प्रदेशाध्यक्ष, अध्यक्ष यांची कामे मोठी आहेत. देशात, राज्यात फिरायचं आहे. संघटना बांधायची आहे. मंत्र्यांची काम असतात. काही ठिकाणी भाषणे करायची आहे.”
ADVERTISEMENT
वाचा >> 30 जून! अजित पवारांच्या ‘या’ बैठकीतच झाला शरद पवारांना धक्का देण्याचा प्लॅन
“शरद पवारांसोबत असताना एक प्रमुख वक्ता म्हणून छगन भुजबळांना बोलावलं जात होतं. आम्ही आमचं काम करत होतो. आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यांनी सांगितलं की, भुजबळ तुम्ही थांबा, तर मी थांबेन.”
राष्ट्रवादीचे नेते म्हणून शरद पवार चुकले आहेत का?
या मुद्द्यावर छगन भुजबळ म्हणाले की, “काल (5 जुलै) अजित पवारांनी म्हटलेलं आहे. एकतर तुम्ही त्या वाटेला जायचंच नाही. एकदा नव्हे, तर चार-पाच वेळा असं झालं. साहजिक आहे की आपण एखाद्याला शब्द देऊन एकदा फिरवला, दोनदा फिरवला. पण, सातत्याने शब्द फिरवत गेलो, तर ज्यांना आपण शब्द देतो, त्यांच्या मनात आपल्या पक्षाबद्दल राग येणं स्वाभाविक आहे. त्याचे पडसाद वेळोवेळी आम्हाला उमटलेले पाहायला मिळतात. त्यामुळे करायचंच नाही. आमचं म्हणणं होतं की एकतर चर्चा करू नका. जे व्हायचं ते होईल. तुम्ही चर्चा करता परत मागे येता. हे काल अजित पवारांनी मांडला.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT