नव्या नवरीला सोडून 'तो' महिला कॉन्स्टेबलसोबत पळाला! बायकोला म्हणाला, "आम्ही दोघे विष पिऊन..."
Viral Love Story : उत्तर प्रदेशच्या हापुड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. महावितरण विभागात काम करणाऱ्या एका तरुणाने आधी लग्न केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पहिलं लग्न 16 फेब्रुवारीला, दुसरं लग्न 1 मार्चला..
घटस्फोट न घेताच केलं दुसरं लग्न
"आम्ही दोघे विष पिऊ..."
Viral Love Story : उत्तर प्रदेशच्या हापुड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. महावितरण विभागात काम करणाऱ्या एका तरुणाने आधी लग्न केलं. त्यानंतर 15 दिवसांनी त्याच्या प्रेयसीसोबत दुसरं लग्न करून फरार झाला. हे प्रकरण प्रेमसंबंध, धोका आणि धमक्यांनी जोडलं गेलं आहे. घडलेला धक्कादायक प्रकार पोलिसांना कळताच महिला पोलीस कर्मचाऱ्याचं तातडीने ट्रान्सफर करण्यात आलं आहे.
पहिलं लग्न 16 फेब्रुवारीला, दुसरं लग्न 1 मार्चला..
बाबूगढ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गजालपूर गावातील रहिवासी नवीनने 16 फेब्रुवारी 2025 ला नेहा नावाच्या तरुणीसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर सर्व परिस्थिती सामान्य स्वरुपाची होती. परंतु, लग्नाच्या 15 दिवसानंतर नवीनने त्याची प्रेयसी आणि महिला हेड कॉन्स्टेबल निर्मलासोबत मंदिरात लग्न केलं.
हे ही वाचा >> Anaya Bangar: 'क्रिकेटर्संनी न्यूड फोटो पाठवले अन्', लिंग बदल झालेल्या अनाया बांगर सांगितलं हादरवून टाकणारं सत्य
घटस्फोट न घेताच केलं दुसरं लग्न
नेहाचा आरोप आहे की, नवीनचं आधीपासूनच निर्मलासोबत प्रेमसंबंध होते. जेव्हा नेहाला याबाबत कळलं, तेव्हा तिने विरोध केला. याशिवाय नवीनने आधी माफी मागितली आणि नंतर गुपचूप निर्मलासोबत लग्न केलं. नेहाने जेव्हा विरोध केला, तेव्हा नवीनने मारहाण करत धमक्या दिल्या.
"आम्ही दोघे विष पिऊ..."
नेहाचा आरोप आहे की, जेव्हा तिने सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नवीनने तिला म्हटलं, आम्ही दोघेही विष पिऊ आणि तुला अडकवू. एव्हढच नाही, त्याने दोघंही एकत्र राहणार असल्याचंही सांगितलं.










