Gold Price Today : बाईईई...झालं की सोनं स्वस्त! आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव काय?

मुंबई तक

Gold Price Today : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज सोन्याच्या दरात थोडीशी घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी (13 सप्टेंबर) सोन्याच्या दरात 200 रुपयांची घट झाली आहे. असे असले तरी देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 73 हजार रुपयांच्या पुढे आहे.

ADVERTISEMENT

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव काय?
gold price today on friday 13 September 2024 after the gauri immersion gold and silver rate know the details
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गौरी गणपती विसर्जनानंतर सोन्याचे भाव घसरले

point

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव काय?

point

देशातील विविध शहरातील सोन्याचे दर वाचा

Gold Price Today  : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज सोन्याच्या दरात थोडीशी घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी (13 सप्टेंबर) सोन्याच्या दरात 200 रुपयांची घट झाली आहे. असे असले तरी देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 73 हजार रुपयांच्या पुढे आहे.आणि 22 कॅरेट सोन्याच्या (Gold Rate) 10 ग्रॅमची किंमत सुमारे 67 हजार रुपये आहे. 18 कॅरेट सोन्याचा किरकोळ दर सुमारे 57 हजार रुपये आहे. तर आज चांदी 86,400 रुपये आहे. चला जाणून घेऊया देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेटची किरकोळ किंमत काय आहे? (gold price today on friday 13 September 2024 after the gauri immersion gold and silver rate know the details)

देशातील विविध शहरातील सोन्याचे दर काय? 

दिल्ली : आज दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 290 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 67,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबई : मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,140 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे ही वाचा : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या घरासमोर तुफान गोळीबार, नेमकं प्रकरण काय?

कोलकत्ता :  कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp