आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या घरासमोर तुफान गोळीबार, नेमकं प्रकरण काय?
Tanaji Sawant Nephew: आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंतांच्या घरासमोर गोळीबार
मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञातांकडून गोळीबार
गोळीबार प्रकरणानंतर पोलिसात गुन्हा दाखल
Tanaji Sawant: गणेश जाधव, धाराशिव: राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. मध्यरात्री 12 वाजून 37 मिनिटांनी गोळीबार झाल्याची माहिती असून दोन अज्ञात इसमानी दुचाकीवर येऊन गोळीबार केल्याचा दावा धनंजय सावंत यांच्या सुरक्षारक्षकाकडून करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षकाने याप्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहेत. (shooting in front of shiv sena minister tanaji sawant nephew dhananjay sawant house what is the acutal case)
ADVERTISEMENT
दरम्यान, हा गोळीबार कोण केला? हे माहीत नसून पोलीस त्याचा योग्य तपास करतील अशी अपेक्षा धनंजय सावंत यांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा>> Pune Murder: भर रस्त्यात 5 गोळ्या झाडल्या, माजी नगरसेवकाच्या हत्येनंतर पवारांचा नेता संतापला!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेते हे उद्या (14 सप्टेंबर) रोजी परंडा येथे येत असून त्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
हे वाचलं का?
खंडेश्वरीच्या वादाची किनार
दोन दिवसापूर्वी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या दौऱ्यात खंडेश्वरी प्रकल्पाच्या कामावरून वाद झाला होता. त्या दृष्टीने या गोळीबाराच्या घटनेचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यावेळी एका आंदोलकाकडे बंदूक होती. पोलीस सुरक्षा असतानाही शस्त्रधारी आंदोलन पालकमंत्री यांच्याजवळ आला होता. असा आरोप धनजय सावंत यांनी केला होता.
हे ही वाचा>> महाराष्ट्रात गुंडाराज! शिवसेना आमदाराच्या बॉडीगार्डची भररस्त्यात एकाला मारहाण', VIDEO व्हायरल
या कार्यक्रमात उद्धव ठाकरे गट, शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते व सावंत गटाच्या कार्यकर्त्यात बाचाबाची झाली होती. त्यावेळी तेथे धनंजय सावंत हे उपस्थित होते. त्यामुळेच काल रात्री झालेल्या गोळीबाराला या वादाची किनार आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT