13th November 2024 Gold Prices in Mumbai : सोन्याच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांसाठी सुवर्ण संधी! 'इतक्या' रूपयांनी झालं स्वस्त...

रोहिणी ठोंबरे

Gold-Silver Price Today 13 Nov 2024 : सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावाने मोठा उच्चांक गाठला होता.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच

point

आज किती रूपयांनी झालं स्वस्त ?

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold-Silver Price Today 13 Nov 2024 : सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावाने मोठा उच्चांक गाठला होता. पण आता आठवडाभरात सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज बुधवार 13 नोव्हेंबर रोजी सोन्याचे भाव प्रचंड घसरले आहेत. ही एक मोठी घसरण मानली जात आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. (Gold-Silver prices today 13 november 2024 what are the rates of 24 22 and 18 carat gold mumbai pune nashik nagpur

देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 carat सोन्याचा भाव 80,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather : धुरकट वातावरण, थंडीची लाट! 'या' जिल्ह्यांना तर पावसाचा इशारा?

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे. 

हेही वाचा : Raj Thackeray : अधिकाऱ्यांना काही कळतं की नाही? उद्धव ठाकरेंची बॅग चेक करण्यावरुन राज ठाकरे काय म्हणाले?

Goodreturns वेबसाईटनुसार, रविवारी (10 नोव्हेंबर 2024) 24 carat 10 gm (1 तोळा) सोन्याचा भाव 77,290 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 440 रूपयांनी घट झाली असून याची किंमत 76,850 रूपये झाली आहे. तर, 22 carat सोन्याचा भाव 70,850 रूपये होता. त्यातही 400 रूपयांनी घट झाली असून त्याची किंमत 70,450 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 91,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp