भयंकर! 6 वर्षांच्या चिमुकल्याचं लिफ्टमध्ये अडकलं मुंडकं अन् सणासुदीला घडला अनर्थ!
अहमदाबादच्या शाहीबाग भागातील डफनाळ्याजवळील वसंत विहार फ्लॅटमध्ये एक भीषण घटना घडली आहे. तळमजल्यावर मुल खेळत होते, त्यानंतर खेळता खेळता मुलगा लिफ्टमध्ये गेला. यावेळी, लिफ्टचा दरवाजा अचानक बंद झाल्याने तळमजला आणि पहिला मजला यामध्ये मुलगा अडकला.
ADVERTISEMENT
Gujrat News: अहमदाबादच्या शाहीबाग भागातील डफनाळ्याजवळील वसंत विहार फ्लॅटमध्ये एक भीषण घटना घडली आहे. वसंत विहार फ्लॅट 2 मधील सी ब्लॉकच्या तळमजल्यावर मुल खेळत होते, त्यानंतर खेळता खेळता मुलगा लिफ्टमध्ये गेला आणि सणासुदीला अर्नथ घडला. (Gujarat News 6 years Old Child Died due to Getting Stuck Lift)
ADVERTISEMENT
यावेळी, लिफ्टचा दरवाजा अचानक बंद झाल्याने तळमजला आणि पहिला मजला यामध्ये मुलगा अडकला. लिफ्टच्या मध्यभागी डोके अडकल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
वाचा : Supriya Sule : “ते वकील शरद पवारांना सॉरी बोलतात”, सुळेंनी सांगितला दिल्लीतला किस्सा
येथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाच्या पथकाने मोठ्या कष्टाने मुलाची सुटका करून 108 रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
हे वाचलं का?
वाचा : NCP : राष्ट्रवादीतील फुटीनंतर दुसऱ्यांदा पवार कुटंबिय एकत्र, सुप्रिया सुळेंकडून फोटो शेअर
शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये घराच्या दरवाज्यासमोरच लिफ्ट आहे. त्यामुळे अनेकदा दुर्दैवी अपघात घडल्याच्या घटना समोर आलेल्या आहे. त्यातच आता अहमदाबादच्या शाहीबाग भागातील ही घटना जिथे या 6 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याशिवाय लिफ्टपासून चिमुकल्यांना दूर ठेवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT