Hardeep Singh Nijjar : कॅनडाच्या उद्धटपणाला भारताचे उत्तर, मोदी सरकारचा दणका
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर भारतानेही ठोस पाऊलं उचलत कॅनडाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे आता कॅनडाला मोदी सरकारने जशास तसे उत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT
India-Canada dispute : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) हत्याकांड प्रकरणात भारतावर कॅनडाकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हरदीप सिंहच्या हत्याकांडप्रकरणी भारताच्या कॅनडातील उच्चायुक्तांना हटवण्याचे आदेश दिले होते. कॅनडाच्या त्या निर्णयानंतर भारतानेही जशास तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे कॅनडाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी करत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. मोदी सरकारने भारतातील कॅनाडाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी (Expulsion) करत त्यांना पाच दिवसांच्या आत भारत सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप वाढत असल्याने ही भारतासाठी चिंतेची बाब असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. त्यामुळेच ही कारवाई केली असल्याचेही सांगण्यात आले आहे. (Hardeep Singh Nijjar murder issue india expels top canadian diplomat after justin trudeau expels top india diplomat)
ADVERTISEMENT
आरोप हास्यस्पद
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह याच्या हत्येप्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाने जून 2023 मध्ये केला होता. त्या प्रकरणी कॅनडातील भारतीय उच्चायुक्ताची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर कॅनडाने भारतावर केलेला आरोप फेटाळून लावत कॅनडातील हिंसाचारात भारताच सहभाग हा आरोप म्हणजे हास्यस्पद असल्याचे म्हटले होते.
हे ही वाचा >> नव्या संसदेचा आजपासून श्रीगणेशा, जाणून घ्या ‘या’ भवनाची 5 वैशिष्ट्ये
भारतानेही केले होते घोषित
भारतीय सुरक्षा यंत्रणांनी हरदीप सिंह निज्जरला फरारी दहशतवादी म्हणून घोषित केले होते. तो दहशतवादी कारवाईत असल्यामुळेच त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. त्याच हरदीप सिंह निज्जरची जून 2020 मध्ये कॅनडातील सरे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
हे वाचलं का?
कॅनडाचे पंतप्रधान नेमकं काय म्हणाले
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाच्या संसदेत (हाऊस ऑफ कॉमन्स) केला होता. कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलताना त्यांनी म्हटले होते की, दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी आमच्या देशाच्या सुरक्षा संस्था भारत सरकार आणि कॅनडाच्या नागरिकांची चौकशी करत आहेत. यावेळी त्यांनी गंभीर आरोप करत कॅनडातील नागरिकांच्या हत्येमध्ये इतर देशांचा आणि इतर सरकारचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. कारण हे आमच्या कायद्याचे उल्लंघन करण्यासारखेच असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते.
हे ही वाचा >> ‘गणराया, लोकशाहीवरील विघ्न दूर कर !’, ‘सामना’तून जनतेसाठी साकडं
देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर गंभीर आरोप केल्यानंतर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारताच्या एका उच्चायुक्तांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई करत आम्ही संबंधित प्रकरणाची सखोल चौकशीही करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच तपासानंतर हे जर सिद्ध झाले तर मात्र आमच्या देशाच्या सार्वभौमत्वावर धक्का बसण्यासारखेच आहेच. त्यामुळे दोन्ही बाजूच्या राष्ट्रांच्या मूलभूत नियमांचे उल्लंघन करण्यासारखे असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT