Amol Shinde: ‘पोलिसांना एवढंच म्हणालो, पोरगं मेलंय का तेवढं सांगा…’, अमोलच्या वडिलांची प्रतिक्रिया

मुंबई तक

ADVERTISEMENT

i just said to the police tell me if my son is dead or live amol shinde father gave an angry reaction security breach in lok sabha and parliament
i just said to the police tell me if my son is dead or live amol shinde father gave an angry reaction security breach in lok sabha and parliament
social share
google news

Security Breach Lok Sabha Amol Shinde: अनिकेत जाधव, लातूर: राजधानी दिल्लीतील संसद परिसरात रंगीत धूराचे फटाके पेटवून घोषणाबाजी करणारा तरूण हा महाराष्ट्रातील असल्याचं समोर आलं आहे. अमोल धनराज शिंदे (Amol Shinde) असं या तरुणाचं नाव असून हा लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी इसगाव येथील रहिवासी आहे. पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या तरुणाने घरात पोलीस भरतीला जात असल्याचं सांगितलं होतं. पण आज त्याला थेट संसदेबाहेर केलेल्या कृत्याबाबत अटक करण्यात आली. याच प्रकरणी मुंबई Tak ने अमोलच्या वडिलांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी अत्यंत उद्विग्न अशी प्रतिक्रयिा दिली. (i just said to the police tell me if my son is dead or live amol shinde father gave an angry reaction security breach in lok sabha and parliamentO)

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल शिंदे याचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यानंतर तो लष्कर आणि पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याचे आई-वडील शेतात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात एकूण 6 सदस्य आहेत ज्यात दोन भाऊ आणि एक बहीण आहे. लग्नानंतर बहीण तिच्या सासरच्या घरी राहते. तर अमोलचे दोघेही भाऊ झरी गावातच मजुरीचे काम करतात.

दरम्यान, 9 डिसेंबर रोजी पोलीस भरतीसाठी दिल्लीला जाण्याचे कारण सांगत अमोलने घर सोडलं होतं. पण आजच्या या घटनेनंतर पोलीस हे अमोल शिंदेच्या झरी गावात पोहोचले. यावेळी त्यांनी घराची झडती घेतली. यावेळी एटीएस, सीआयडी आणि स्थानिक पोलीस संयुक्तपणे या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या सगळ्याबाबत बोलताना अमोलच्या वडिलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते वाचा:

मी शेतीच करतो.. रोजगारावर जातो.. माझं अमोलशी 10 तारखेला शेवटचं बोलणं झालं.. 9 तारखेला गेला तो इथून. पोलीस भरती आहे, मिलिटरी भरती आहे.. म्हणून मी दिल्लीला चाललोय असं सांगितलं.

भरतीची माझी अपेक्षा होती. पण मला नोकरी लागली नाही.. मी एवढं शिकलो पण काय फायदा नाही माझा.

आपण काय चोरी केलीए का.. कोणाची लबाडी केलीए? वर्षाला लाखभर खर्च करत होतो. कोणी पैसे भरून कामाला लागत होते.. हा रोजगार करून किती दिवस मरू म्हणून त्याने हे केलं असेल. आता काय करायचं आम्ही?

वाचलं तर येईल गावाकडं.. मेलं तर मेलं तिकडं.. काय एक नव्हतं म्हणून बसायचं.. हा त्याने कुठं डाका घातलाय किंवा काही केलंय म्हटलं तर वेगळं..

रोज सिमेंट कामाला जात होता.. आम्हाला म्हणून गेला की, पोलीस भरती आहे.. तिकडे जातो.

त्याने तिकडे काय केलं आणि काय नाही.. हे आम्हाला काहीच माहीत नाही. फक्त हे पोलीस लोकं आले तेव्हा माहित झालं. मी एवढंच म्हटलं की, पोरगं जिवतं आहे का.. मेलंय तेवढंच सांगा.. तेवढ्याच तयारीत आम्ही आहोत. मेलं तरी माती करायला तयार आहोत आणि जिवंत असलं तरी पण बघायला तयार आहोत. अशी प्रतिक्रिया अमोल शिंदेच्या वडिलांनी मुंबई Tak शी बोलताना दिली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT