Ayodhya Ram Mandir: रामाची मूर्ती घडवणारा अरूण योगीराज प्रचंड चर्चेत, नेमका आहे तरी कोण?

मुंबई तक

अयोध्येतील राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठापनाचा कार्यक्रम काही दिवसांवरच आला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची प्रत्येकाला उत्सुकता लागून राहिली आहे. रामललाची मूर्ती कोणी बनवली याची मोठी उत्सुकता लागून राहिली मूर्तीकारामुळे. कारण ज्यांनी राम, सीता आणि हनुमानाची मूर्ती बनवली आहे त्या अरुण योगीराज यांनी बनवलेल्या अनेक व्यक्तींचे पुतेळ देशातील महत्वाच्या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT

idol of Ram Lala in Ayodhya Ram temple was made by Arun Yogiraj of Mysore.
idol of Ram Lala in Ayodhya Ram temple was made by Arun Yogiraj of Mysore.
social share
google news

Ram Mandir: कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत (Ayodhya) राम मंदिर आता पूर्णत्वाकडे जात आहे. याच महिन्याच्या 22 तारखेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यामुळे अयोध्येत राम मंदिराची जोरदार तयारी केली जात आहे. या मंदिराचे जसे सगळ्यांना आकर्षण आहे त्याच प्रमाणे मंदिरातील रामललाच्या मूर्तीचेही सगळ्यांना उत्सुकता आहे. त्यातच आज रामललाची मूर्ती आज कोणत्या ठिकाणी बसवली जाणार आहे तेही आज स्पष्ट केले जाणार आहे. याबाबत एएनए वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मंदिरात प्राणप्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या राम, सीता आणि हनुमानाच्या मूर्तीला अंतिम रुप हे कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज (Sculptor Arun Yogiraj) यांनी दिले असल्याचे सांगितले आहे.

‘रामलला’ सोशल मीडियावर

राम, सीता आणि हनुमानाच्या मूर्तीबाबत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. प्रल्हाद जोशी यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करताना म्हटले आहे की, जिथं राम आहे, तिथं हनुमान आहे. त्यामुळे अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनासाठी आता मूर्तींची निवड केली गेली आहे. देशातील प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी रामललाची बनवलेली मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आता अयोध्येच्या राम मंदिरात केली जाणार आहे.

हे ही वाचा >> पोटावरची चरबी झटपट होईल गायब, फक्त ‘याचा’ करा वापर

अधिकृत घोषणा नाही

मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मूर्तींची माहिती दिली असली तरी राम मंदिर ट्रस्टकडून याची अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. त्याचबरोबर ट्रस्टने हेही सांगितले नाही की, नेमकी कोणती मूर्ती निवडली गेली आहे. त्यामुळे ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी हेही सांगितले की, ज्यांना जे सांगायचे ते सध्या सांगत आहेत. मात्र मी सध्या काही बोलणार नाही. कारण अजून मूर्तीबाबत कोणताही निर्णयही झाला नाही.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp