Maratha Morcha : ‘तुम्ही जर असं केलं तर आरक्षण द्यायचं कुणाला?’ जरांगे पाटलांचा भावूक सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Manoj jarange patil jalna maratha reservation umraga youth suicide
Manoj jarange patil jalna maratha reservation umraga youth suicide
social share
google news

Manoj Jarange Patil : शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना आरक्षण लागतं आहे, त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जीवाची बाजी लावून आम्ही आंदोलनला बसलो आहे. त्यामुळे तुम्ही जर असं आत्महत्येसारखं (Suicide) पाऊल उचलत असाल तर मग ते आरक्षण द्यायचं कुणाला असा भावूक सवाल आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगे पाटलांचे आंदोलन सुरु असतानाच राज्यातील वेगवेगळ्या ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन सुरु असतानाच मराठा आरक्षणासाठी एका युवकाने आंदोलन केले असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील आंदोलनकर्त्यांना आवाहन करत आरक्षणासाठी कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये अशी साद घातली आहे. आम्ही जीवाची बाजी लावून तुमच्यासाठी आंदोलन करत असताना टोकाचा विचार करत असाल तर मग हे आंदोलन द्यायचे कुणाला असा सवालही त्यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

टोकाचं पाऊल उचलू नये

मराठा आरक्षणासाठी गेल्या अकरा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु आहे. त्यांनी सरकार आणि विरोधकांबरोबर चर्चा करुन मराठा आरक्षणावर सरकारला अध्यादेश काढण्यास लावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निजामकालीन पुरावे असणाऱ्यांना मराठा आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळावे असा अध्यादेशही काढला मात्र त्यामध्ये जरांगे पाटील यांनी काही बदल सुचवले आहे. सरकारबरोर बोलणी चालू असतानाच मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने मात्र आत्महत्या केली आहे. त्यामुळेच आज पत्रकार घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नये असं कळकळीचे आवाहनही त्यांनी केले आहे.

हे ही वाचा >> Chhatrapati Shivaji maharaj : अफजल खान वधातील महाराजांची ‘ती’ वाघनखं आता मायभूमीत येणार

जीवाची बाजी लावून बसलो

मराठा समाजाला आंदोलन मिळावे, त्यासाठी सरकारने अध्यादेश काढावे यासाठी गेल्या अकरा दिवसांपासून जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारले आहे. आरक्षणावर सरकारबरोबर चर्चा केल्यानंतर शिंदे-फडणवीस-पवार सरकारने अध्यादेशही काढला आहे. मात्र त्यामध्ये त्यांनी बदल सुचवत अध्यादेश निघाल्यानंतरही त्यांनी आंदोलन सुरुच ठेवले आहे. तरीही जर मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव टोकाचे पाऊल उचलत असतील तर ते चुकीचे आहे. कारण जीवाची बाजी लावून मी आंदोलन करत आहे. राज्यभरात कुठे कुठे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे कुणीही वाईट विचार न करता लोकशाही मार्गाने आंदोलन करा असंही त्यांनी मराठा आंदोलनकर्त्यांना सांगितले आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या विजयाचा फायदा घ्या

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कायदेशीर आंदोलन मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाला यश मिळणार आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र सरकारने काढलेल्या अध्यादेशात जरांगे पाटील यांनी बदल सुचवले आहेत. त्यामुळे त्या बदलानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर त्या मिळाल्या विजयाचा तुम्ही युवकांनी फायदा घ्या असं आवाहनही त्यांनी केले आहे.

शांततेत आणि लोकशाही मार्गानेच आंदोलन

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबरोबरच राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधूनही आंदोलन सुरु आहे. मात्र त्या आंदोलनाला एका युवकाच्या आत्महत्येमुळे गोलबोट लागले आहे. त्यामुळेच जरांगे पाटील यांनी शांततेत आणि लोकशाही मार्गानेच आंदोलन करण्याचा आवाहन त्यांनी केले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Radhakrishna Vikhe Patil : धनगर आरक्षणासाठी कार्यकर्त्याने विखे पाटलांवर उधळला भंडारा

आमच्या निर्णायावर आम्ही ठाम

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरुन जालन्यातील अंतरवाली सराटीत आंदोलन सुरु आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने अध्यादेश काढले. त्यामध्ये त्यांनी निजामशाहीकालीन ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल असं स्पष्ट केले. मात्र काढलेल्या अध्यादेशामध्ये बदल सुचवून जरांगे पाटील यांनी आंदोलन आपले कायम ठेवले आहे. त्या आंदोलनाचा आज अकरावा दिवस आहे. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, सरकारचा निरोप आला तरी ठिक नाही आला तरी ठिक, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याचे भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT