Hardeep Singh Nijjar : कोण होता खलिस्तानी दहशतवादी? ज्याच्या हत्येने भारत-कॅनडा संबंध झाले खराब

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

India-Canada dispute : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) हत्याकांड प्रकरणाने सध्या भारत-कॅनडा संबंध ताणले गेले आहेत. 18 जून 2023 ला कॅनडाच्या सरे शहरात हरदीप सिंग निज्जरची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाच्या तीन महिन्यानंतर आता मोठा वाद पेटला आहे. त्यामुळे भारत-कॅनडा संबंध नेमके का ताणले गेले आहेत? आणि हरदीप सिंग निज्जर हा नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात. (india canada dispute pm narendra modi justin trudeau who is hardeep singh nijjar)

ADVERTISEMENT

नेमका वाद काय?

हरदीप सिंग निज्जरच्या हत्याकांडाच्या तब्बल तीन महिन्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेओने भारतावर गंभीर आरोप केला होता. कॅनडाने हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणाचा तपास करून या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला होता.या आरोपानंतर कॅनडा सरकारने तिथल्या भारताच्या उच्चायुक्तांची हक्कालपट्टी केली होती. त्यामुळे यावर आता भारताने सुद्धा त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

कॅनडाने भारताच्या उच्चायुक्तांची हक्कालपट्टी केल्यानंतर भारताने देखील देशातील कॅनडातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याला भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत निवेदन जारी करून माहिती दिली. भारतात असलेल्या कॅनडाच्या एका उच्चाधिकाऱ्याला पुढच्या पाच दिवसांत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

हत्येचे प्रकरण काय?

18 जून 2023 ला कॅनडाच्या सरे शहरात हरदीप सिंग निज्जरची हत्या करण्यात आली. एका गुरूद्वाराच्या पार्किंगमध्ये दोन तरूणांनी निज्जरवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. हरदीप सिंग निज्जर खलिस्तानी समर्थक असल्याची माहिती समोर आली होती. या हरदीप सिंग निज्जरमुळे आता भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.

कोण आहे निज्जर ?

हरदीप सिंग निज्जर हा मूळचा पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील असून 1995 मध्ये तो कॅनडाला गेला होता. तेव्हापासून तो ‘खलिस्तानी दहशतवाद’शी संबंधित होता. सुरुवातीला तो बब्बर खालसा नावाच्या खलिस्तानी संघटनेशी जोडला गेला होता.

ADVERTISEMENT

2007 मध्ये लुधियानामध्ये शिंगार सिनेमात स्फोट झाला आणि 2009 मध्ये पटियाला येथे राष्ट्रीय शीख संगत अध्यक्ष रुलदा सिंह यांची हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांमध्ये निज्जरचा हात असल्याचे सांगण्यात आले. नोव्हेंबर 2020 मध्ये, डेरा अनुयायी मनोहर लाल अरोरा आणि रोपरमधील एका गावातील सरपंच अवतार सिंह यांच्या हत्येप्रकरणी निज्जरचे नाव पुढे आले होते.

ADVERTISEMENT

मीडिया रिपोर्ट्सनुसार, निज्जर कॅनडातील सरे शहरात गँगस्टर अर्शदीप सिंग गिल उर्फ ​​अर्श दलाचा सहकारीही बनला होता. पंजाब आणि कॅनडात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पैशांशी संबंधित गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग होता आणि त्यामुळे तो कॅनडामधील इतर अनेक टोळ्यांचाही लक्ष्य होता.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कॅनडाच्या वर्ल्ड शीख ऑर्गनायझेशनने (डब्ल्यूएसओ) निज्जरच्या हत्येमागे भारतीय गुप्तचर संस्थांचा हात असल्याचा आरोप केला होता. निज्जर यांच्या हत्येचा सखोल तपास करण्याची मागणी या संघटनेने कॅनडाच्या प्रशासनाकडे केली होती. निज्जरला भारतीय गुप्तचर संस्था आपल्याला लक्ष्य करू शकतात याची भीती वाटत होती, असा दावाही करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT