Sanjay Raut : ‘…मग आताच का कायदा सुव्यवस्था निर्माण झाली?’ ; राऊतांचा जळजळीत सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maratha Akrosh Morcha mp sanjay raut criticized maharashtra government cm eknath shinde
Maratha Akrosh Morcha mp sanjay raut criticized maharashtra government cm eknath shinde
social share
google news

Maratha Akrosh Morcha : जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा क्रांती मोर्चावर लाठीहल्ला झाल्यानंतर आता सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. या प्रकरणावर खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी बोलताना सांगितले की, या प्रकरणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीमध्ये जे दोषी आढळतील  त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले, मात्र यामध्ये सरकारच दोषी आहे. हे राज्य कोणाचे आहे? गृह खातं कोणाकडे आहे ? असा सवाल करत संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

स्वतः मुख्यमंत्री ‘त्या’ समितीमध्ये

यावेळी संजय राऊत यांनी टीका करताना ते म्हणाले की, विरोधी पक्षांकडे पोलीस खाते आहे का? विरोधी पक्ष पोलीस खाते चालवते आहे का ? आमच्या काळात असे मोर्चे निघाले मात्र असे पोलिसांसारखे लाठीचार्ज आणि लोकांवर हल्ले केले नाहीत. स्वतः मुख्यमंत्री त्या समितीमध्ये होते. अजित पवार होते त्यांना हा प्रश्न माहिती आहे, तरीही जालनामधील आंदोलन का चिघळले असा सवालही त्यांनी केला आहे.

हे ही वाचा >> ADITYA-L1 MISSION ISRO: सूर्य मोहिमेचं काउंटडाऊन सुरू, काही मिनिटांत Launching; इथे पाहा LIVE

लक्ष हटवण्यासाठी लाठीचार्ज

पोलिसांनी लाठीहल्ला केल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, मराठा समाजावरती हल्ले पोलिसांनी का केले यामध्ये एक राजकीय सुसूत्रता असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. यावेळी ते म्हणाले की, मुंबईमध्ये इंडियाची बैठक सुरू होती. देशासह महाराष्ट्रातील जनतेचे बैठकीकडे लक्ष होते. दिग्गज नेत्यांची भाषणे सुरू असताना आणि सर्व माध्यमांवरून ही प्रसारित होत असतानाच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे त्यावरून लक्ष हटवण्यासाठी जालन्यामध्ये आंदोलनावर लाठीचार्ज करून गोंधळ निर्माण करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्रात तणावपूर्ण परिस्थिती

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आतापर्यंत अनेक मोर्चे निघाले आहेत. मराठा समाजाचे हे मोर्चे आताच निघालेले नाहीत, तर याआधीही मोर्चे निघाले आहेत. मग आताच का कायदा सुव्यवस्था निर्माण झाली आहे असा जळजळीत सवालही खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक लाठी हल्ला करून महाराष्ट्रात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण केली जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या तणावाच्या माध्यमातूनच मुंबईत चाललेल्या इंडिया बैठकीचे लक्षण सुनियोजितपणे हटवायचे होते. त्यासाठी हा लाठीहल्ला केला होता अशी टीकाही त्यांनी केली आहे.

सरकार वैफल्यग्रस्त

आंदोलकांवर लाठीहल्ला करणे म्हणजे हे सरकारचं वैफल्य आहे. सरकार वैफल्यग्रस्त झाले असून या प्रकारे सरकार आपली अस्वस्थता बाहेर काढत आहे. मात्र सरकारने हे लक्षात घ्यावे की, या मोर्चामध्ये तरुण आबालवृद्धांचाही समावेश आहे.

ADVERTISEMENT

दंगली घडवल्या जातील

खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका करताना त्यांनी देशात आणि महाराष्ट्रात दंगली घडवल्या जातील हे त्याचेच प्रमाण आहे अशी घणाघात टीकाही त्यांनी केली आहे. निवडणुकीआधी या राज्यात आणि देशात दंगली घडविले जातील हे आम्ही आतादेखील सांगत अशी शक्यताही राऊतांकडून वर्तवली जात आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Jalna Maratha Andolan Update: ‘लाठीहल्ला करुन…’ संभाजीराजे संतापले, डागली तोफ

सरकार कारस्थानामध्ये मश्गुल

राज्यातील सरकारला निवडणुकीआधी जाती-पातीच्या दंगली घडवायच्या आहेत. हे सरकार काय करते ते कारस्थानामध्ये मश्गुल आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा एवढे हे प्रकरण गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच विरोधकांना तुरूंगात टाकायचं, भ्रष्टाचार करायचा, खोटे खटले टाकायचे आणि असे हल्ले करायचे असा आरोपही त्यांनी सरकारवर केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT