अन् अस्वलाला समोर पाहून बिबट्याही घाबरला… ताडोबातील थरारक Video!
चंद्रपुरच्या ताडोबा जंगलातील (Tadobo tiger reserve) एका दुर्मिळ घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बिबट्या आणि अस्वल आमने-सामने आले आहेत.
ADVERTISEMENT
leopard got scared seeing the bear : विकास राजूरकर, चंद्रपूर : चंद्रपुरच्या ताडोबा जंगलातील (Tadobo tiger reserve) एका दुर्मिळ घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बिबट्या आणि अस्वल आमने-सामने आले आहेत. या घटनेत बिबट्या (leopard)अस्वलावर (bear)हल्ला करून त्याचा शिकार करेल असे आपल्याला सुरुवातीला वाटते, मात्र तसे काही एक घडत नाही, याउलट अस्वलाचा रोष पाहून बिबट घाबरला आहे. ताडोबाच्या जंगलातील हे दुर्मिळ दृश्य रणजित मंडल नावाच्या पर्यटकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (leopard got scared seeing the bear in front of him thrilling video viral from Tadobo tiger reserve)
ADVERTISEMENT
बिबट्या (leopard) म्हटलं की चपळ, चतुराई, चित्तथरारक शिकार, क्षर्णाधात समोरच्या प्राण्याला भक्ष्य करणारा प्राणी अशी अशी एक व्याख्या या प्राण्य़ाबद्दल लोकांच्या मनात बनलीय. मात्र हाच बिबट्या जेव्हा त्याच्या व्यक्तीमत्वाविरूद्ध वागतो, तेव्हा पर्यटकांनां दुर्मिळ दृष्य पाहण्याचा योग येतो. असाच योग चंद्रपूराच्या ताडोबा जंगलात पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांना आला आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओत काय?
महाराष्ट्राच्या चंद्रपूरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून (Tadobo tiger reserve) एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावासे वाटेल असे हे दृष्य आहे. कारण हे जंगलाचे अतिशय दुर्मिळ दृश्य आहे, जे सामान्यतः पहायला मिळत नाही. हा व्हिडिओ ताडोबाच्या कोलारा बफर झोनचा आहे. रणजीत मंडल नावाच्या एका पर्यटकाने आपल्या कॅमेऱ्यात हा व्हिडिओ कैद केला होता. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
हे वाचलं का?
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, भल्या भल्या प्राण्यांची शिकार करणारा बिबट्या अस्वलासमोर पुतळ्यासारखा उभा आहे. प्रत्यक्षात बिबट्या पाण्याच्या डबक्यातुन पाणी पिऊन परत जात होता, तेवढ्यात अस्वल पाणी पिण्यासाठी तिथे पोहोचला होतात. अचानक दोघांची गाठभेट समोरासमोर झाली होती. आपल्यासमोर बिबट्याला पाहून अस्वलीने उग्र रूप धारण केले. भली मोठी अस्वल आपल्या दोन्ही पायावर उभे राहुन जणू बिबट्याला आव्हान देत असल्याचे व्हिडिओ पाहताना वाटत आहे. अस्वलाचं हे महाकाय रुप पाहून बिबट्याची सिट्टी बिट्टी गुल झाली होती आणि तो स्तब्ध होऊन शांतपणे अस्वलाकडे पाहत राहिला होता.
अस्वलाला बहुधा बिबट तिथे पाणी पीत होता हे माहीत नसावे, त्यामुळे अस्वल आपल्याच नादात पाणी पिण्यासाठी जात होते आणि अचानक दोघांचा आमना सामना झाला होता. आधी बिबट्याने अस्वलाला पाहिले होते आणि तो अस्वलावर हल्ला करण्याच्या तयारीतच होता, पण अस्वलाचे हे भयानक रूप पाहून बिबट्याने आपला निर्णय बदलला आणि अस्वलाकडे स्तब्ध बघतच राहिला,अस्वलाला जेव्हा स्वतःला सुरक्षित वाटले तेव्हा तोही पाणी पिण्यासाठी पाण्याच्या डबक्यजवळ गेला आणि पानी पिऊ लागला.
ADVERTISEMENT
हा व्हिडीओ थरारक असला तरी हे दृष्य दुर्मिळ आहे. हे दृश्य पाहण्याची मोजक्याच पर्यटकांना संधी मिळाली. दरम्यान व्हिडीओमध्ये दिसणारे अस्वल देखील खूपच सुंदर दिसत आहे, जणू अस्वलाने गळ्यात हार घातल्याचे वाटत आहे, तसेच दोन्ही पायावर उभ्या असलेल्या अस्वल अतिशय रुबाबदार दिसत आहे. बिबट्या आणि अस्वलाचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT