Allahabad high court : “प्रेमात ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार नाही”
प्रेमसंबंध जर दीर्घकाळ असतील, आणि त्यानंतर त्या दोघांचे शरीर संबंध आले असतील तर या प्रकरणामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करता येणार नाही असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
Allahabad court : देशात महिला आरक्षण विधेयकावरुन जोरदार चर्चा चालू असतानाच आता प्रेमप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने (High Court) एक निर्णय दिला आहे. त्याचीही आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये म्हटले आहे की, दीर्घकालीन प्रेमप्रकरणात निर्माण झालेले शरीरसंबंधाला बलात्कार (Rape) म्हणता येणार नाही. जरी लग्नाला नकार दिला गेला असला तरी. याच प्रकारे एका प्रकरणात प्रेयसीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या प्रियकराविरुद्ध कनिष्ठ न्यायालयात सुरु असलेली फौजदार कारवाई रद्द करण्यात आली आहे. कनिष्ठ न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देणारी झियाउल्लाच्यावतीने देण्यात आलेली याचिका स्वीकारताना हा निर्णय देण्यात आला आहे. हे प्रकरण 2008 मध्ये घडले होते. (love affair is not rape big decision of Allahabad court)
ADVERTISEMENT
लग्नास नकार मिळाला
हे प्रेमप्रकरण 2008 मध्ये घडले होते. संत कबीर नगरमधील मुलगी गोरखपूरमध्ये तिच्या बहिणीच्या लग्नात एका युवकाला भेटली होती. त्यानंतर तिची आणि तरुणाची भेट होत राहिली. 2008 ते 2013 पर्यंत ही दोघं कुटुंबीयांना माहिती असतानाही भेटत होती. या काळात त्यांच्यामद्ये शरीरसंबंधही प्रस्थापित झाले होते. त्यानंतर नोकरीसाठी जियाउल्लाच्या कुटुंबीयांनी त्याला पैशासाठी सौदी अरेबियाला पाठवल्याचा आरोप प्रेयसीने केला आहे. झियाउल्ला परत आल्यावर त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळेच प्रेयसीने संत कबीर नगरच्या महिला पोलिस ठाण्यात प्रियकर झियाउल्लावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा >> क्लार्कने बॉसला घरी बोलवले, अन् तुकडे केले, नंतर भयानकच…
स्वतःच्या इच्छेने नातेसंबंध
या नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा वकिलाने सांगितले की, जेव्हा शरीर संबंध आले त्यावेळी ती प्रेयसी ही प्रौढ होती. त्यावेळी तिने स्वतःच्या इच्छेने नातेसंबंध निर्माण केले होते. त्यानंतर ज्यावेळी प्रियकराने लग्नाला नकार दिला त्यावेळी मात्र त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर याचिकाकर्त्याच्या वकिलांचा युक्तिवाद आणि पीडितेचे म्हणणे ग्राह्य धरून न्यायालयाने झियाउल्लाविरुद्ध दाखल केलेले आरोपपत्र रद्द केले.
हे वाचलं का?
बलात्कार म्हणता येणार नाही
त्यानंतर न्यायालयाने याबाबत निर्णय देताना सांगितले की, दीर्घकालीन प्रेमप्रकरणात निर्माण झालेले शरीरसंबंध हे बलात्कार मानता येणार नाहीत. जरी लग्नाला नकार दिला असला तरी त्याला बलात्कार म्हणता येणार नाही असं स्पष्ट करण्यात आले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT