खातेवाटप होताच आदित्य ठाकरे शिवसेनेच्या ‘त्या’ आमदारांना काय बोलले?
अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना खातेवाटपही झाली. आता अधिवेशन सुरू होणार असल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेला आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra Portfolio Distribution : अजित पवारांसह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या 9 मंत्र्यांना अखेर 12 दिवसांनंतर खाती मिळाली. दोन आठवडे मुंबईपासून दिल्लीपर्यंत बैठका झाल्यानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले. पण, यामुळे प्रलंबित असलेला मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबणीवर पडला आहे. शुक्रवारी (15 जुलै) खातेवाटप करण्यात आल्यानंतर शिवसेना आमदार आदित्या ठाकरे यांनी मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्या शिवसेनेच्या आमदारांवर ‘ट्विट’हल्ला केला.
अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाला. 2 जुलै रोजी अजित पवार आणि इतर 8 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, खातेवाटपाचा तिढा निर्माण झाला होता. आधी मुंबईत आणि नंतर दिल्लीत बैठक झाल्यानंतर खातेवाटप जाहीर झाले. यात शिवसेनेकडील 3 खाती अजित पवार गटाकडे गेली. तर भाजपकडची 6 खातीही देण्यात आली.
आदित्य ठाकरे म्हणाले, ‘ना खाती, ना इज्जत’
भाजप-शिवसेना-अजित पवार गट सरकारचं खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांच्या वर्मावर बोट ठेवलं. आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केले. ज्यात ते म्हणाले, ‘चला, अखेर मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर 13 दिवसांनी खाते वाटप झालं.”
वाचा >> Wife Swapping : ‘तू माझ्या मित्रासोबत झोप, मी त्याच्या पत्नीसोबत…’, उच्चभ्रू सोसायटीतील घटना
“पहिले 20, नंतर 9 असा विस्तार झाला. आता ह्या सगळ्यानंतर ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती, ना इज्जत! त्यांची खरी किंमत काय आहे हे त्यांना गद्दारी करायला लावणाऱ्या मिंधे-भाजपा ने ३३ देशांना दाखवून दिलंय! अभिनंदन!”, असा टोला लगावत आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या आमदारांना डिवचलं आहे.










